सहाय्यक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत पारसकर ५ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडला गेला



धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. 

यावल  ( सुरेश पाटील ) धुळे येथील आपत्ती प्रतिसाद दल विभागातील पोलीस उपअधीक्षक तथा सहाय्यक समादेशक चंद्रकांत बाबुराव पारस्कर यांना ५ हजार रुपयाची लाच घेताना आज धुळे येथील लाच लुचपत विभाग पथकाने रंगेहात पकडल्याने धुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की

आरोपी चंद्रकांत बाबुराव पारसकर,सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे यांनी ५,०००/- रु लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्वतःस्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आल्याने त्यांचे विरुध्द गुन्हा.[ads id="ads1"]  

तक्रारदार हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दल,धुळे येथे नर्सिंग ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत. दलातील तक्रारदार व त्यांचे सोबत इतर ०५ महिला नर्सिंग ऑफिसर असे १४ व १५ एप्रिल रोजी कर्तव्यावर गैरहजर राहिले असल्याने सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत पारसकर यांनी त्यांचे कडुन गैरहजेरीबाबत खुलासा घेतला होता.त्यानंतर चंद्रकांत पारसकर यांनी तक्रारदार यांना बोलावुन घेवुन त्यांना गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांकडुन प्रत्येकी १,०००/- रुपये असे एकुण ५०००/- रुपये जमा करुन मला आणुन दे, नाहीतर सर्वांची बिनपगारी करेल असे तक्रारदार यांना सांगितले होते. तक्रारदार यांना कर्मचा-यांकडुन पैसे जमा करुन सदरची लाचेची रक्कम ५०००/- रुपये अशी आलोसे पारसकर यांना देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि.२० एप्रिल २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,धुळे कार्यालयात समक्ष येवुन तक्रार दिली होती.सदर तक्रारीची दि. २०.०४.२०२४ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान आलोसे चंद्रकांत बाबुराव पारसकर यांनी तक्रारदार यांचेकडे प्रती गैरहजर कर्मचा-यांकडुन १,०००/- रुपये याप्रमाणे ५०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम आज  सोमवार दि. २२ एप्रिल २०२४ रोजी त्यांचे एसआरपी. कॉलनी,नकाणे रोड,धुळे येथील राहते घरी स्विकारते वेळी त्यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम खाली टाकुन दिली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले 

[ads id="ads2"]    असुन चंद्रकांत बाबुराव पारसकर,सहायक समादेशक, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे यांचे विरुध्द पश्चिम देवपुर पो.स्टे.जि.धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी,तसेच राजन कदम, मुकेश अहिरे,प्रशांत बागुल, संतोष पावरा,रामदास बारेला, प्रविण पाटील,मकरंद पाटील, प्रविण मोरे,सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस उपअधिक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️