रावेर प्रतिनिधी/मुबारक तडवी
रावेर तालुक्यातील लोहारा ते गुली लोहारा कुसूंबा रावेर या आदिवासी बहुल गावांना जोडणाऱ्या सुकी नदीवर लोहारा तालुका रावेर गावातील १५ वर्षांपूर्वी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित पुल बांधलेला आहे परंतु हा अरुंद व कमी उंचीचा असल्यामुळे सातपुडा पर्वतात पहील्याच पावसाळयात सुकी नदीचे पुराचे पाणी पुलावरून वाहत असते सातपुडा पर्वतात वृक्ष तोडीमुळे ढिसूळ झालेली डोंगरावरची माती पावसाळ्यात सुखी नदीत येते आणि नदीत गाळ.माती .दगड .आल्याने लोहारा व गुली लोहारा या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलावरून वाहतूक बंद होते.[ads id="ads1"]
शेतीच्या कामासाठी तालुक्यातील उत्तर भागातील गुली लोहारा कुसूंबा सहित अनेक गावांच्या शेतकरीसह नागरिकांची पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्याने गैरसोय होते.लोहारा सुकी धरणातील पाण्यामुळे या भागातील शेती व पाण्याच्या प्रश्न मार्गी लागला आहे. परंतु लोहारा बंधाऱ्याची. व पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात रहदारीच्या वाहतूकिची अडचण निर्माण होते.[ads id="ads2"]
नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शासनाने लोहारा पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करणे आवश्यक असून शासनाने प्रशासनाने तसेच प्रतिनिधी लोकप्रतिनिधी यांनी जातीने लक्ष घालून संबंधित पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी मंजूर करून तातडीने पूर्ण करण्याची मागणी लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते हसन रुबाब जमादार यांनी केली आहे