3 मे रोजी भुसावळ येथे ॲड.प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा

 


०४ रावेर लोकसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय पंडित ब्राह्मणे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा दिनांक 3 मे 2024 रोजी भुसावळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, (पूर्वीचे डी एस ग्राउंड) येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. [ads id="ads1"]  

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भुसावळ शहरात पहिलीच जाहीर सभा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांची होत आहे. अजून कोणत्याही राजकीय पक्षाने भुसावळ शहरात सभा घेतलेली नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडी प्रचारात आघाडीवर राहील की काय अशी चर्चा भुसावळ शहरातील नागरिकात व्यक्त होत आहे. [ads id="ads2"]  

सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याच्या आव्हान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️