"भुसावळ येथील रहिवासी व पेशाने शिक्षक असलेला इक्बाल नामक व्यक्ती कडून अशा संशयास्पद पदव्या,प्रमाणपत्र अनेक गरजूंना बनवून किंवा मिळवून दिल्या बाबतचा प्रकार एप्रिल २०२३ मध्ये देखील चर्चेत आल्याची गोष्ट आता याप्रकरणा मुळे पुन्हा चर्चिले जात आहे.तरी हे व्यक्ती तो तर नाही ना?व त्यांचे कडून अशा पदव्यां घेऊन अनेकांनी तर शासनाची आर्थिक फसवणूक केली नाही ना?असे संशय निर्माण करणारे प्रश्न भेडसावत असून,या संदर्भात आणि सदर गंभीर प्रकरणाची सखोलपणे चौकशी व कारवाई होणेकामी भुसावळ,सावदा येथील काही जागृत व्यक्ती जिल्हा पोलिस अधीक्षक जळगाव यांच्याकडे पुराव्यानिशी लवकरच तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे."[ads id="ads1"]
----------------------------------------------------------
सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी सावदा या शैक्षणिक संस्थेचा संचालक तथा भुसावळ न.पा.उर्दु शाळा क्रं.२५ येथील उपशिक्षक शेख इक्बाल शेख कादर मन्यार हा ॲंग्लो उर्दु हायस्कूल सावदा या शाळेत झालेली बोगस शिक्षक भरती प्रकरणी सन २०२२ मध्ये दाखल गंभीर गुन्ह्यात आरोपी असून,त्याचे विरुद्ध सन २०२० मध्ये देखील सावदा पोलिस ठाण्यात एक एन.सी.आर नोंद आहे.ही माहिती त्यांनी जाणीवपूर्वक लपवून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातून स्वत:चा नील चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळवून घेतला.तसेच सन १९९४ मध्येच त्यांनी बी.ए.इंग्लिशची कंप्युटर राईज पदवी कानपूर विद्यापीठातून प्राप्त करून घेतली होती.तसेच या पदवीवर विद्यापीठाचे ई-मेल आयडी सुद्धा नमुद आहे.पंरतू सदर काळात टायपिंग मशिन होते.तर या उपशिक्षकाची पदवी कंप्युटर राईज कशी?तसेच होटमेलचा जन्मच सन २००३ मध्ये झाला.[ads id="ads2"]
व यानंतर ई-मेल भारतात लॉन्च झाला.तर सदरील पदवीवर ई-मेल आयडी कसे? इतके वर्ष त्यांनी ही पदवी का लपवून ठेवली होती?यावरून प्रथमदर्शनी स्पष्ट दिसून येते.की,सदरील पदवी संशयास्पद आहे.तसेच या बोगस शिक्षक भरती प्रकरणी दाखल गुन्हेमध्ये सावदा पोलिस ठाण्यासह रावेर कोर्टात त्यांनी जाब जबाब नोंदविण्यासाठी संबंधित न.पा.प्रशासन व शिक्षण विभागाचे सक्षम अधिकारीची पुर्वपरवानगी सुद्धा घेतली नसल्याची बाबही समोर आली असून,जामिन मिळवण्यासाठी फरारी काळात यासर्व गंभीर गोष्ट्या लपवून इतर विविध कारणाखाली शाळेतून सुट्ट्याही मंजूर करून घेतल्या आहे.याबाबत भुसावळ येथील जोहेब सैय्यद या जागृत नागरिक तथा करदाता यांनी पुराव्यानिशी पालिकेचे मुख्याधिकारी,व प्रशासन अधिकारी कडे तक्रार दाखल करुन दिड महिना उलटला तरी अद्याप अशा प्रकारे शासनाची आर्थिक फसवणूक करणारे उपशिक्षकची चौकशी जलदगती ऐवजी कासवागतीने होणे.अनेक प्रश्न उपस्थित करित आहे.