सावदा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार मंगळवार रोजी दुपारी ५वाजता बाईक व कार अपघात झाला.सावदा-पाल महामार्गावर चिनावल येथील बाईक स्वार व होंडा कंपनीची कार यांचा अपघात होऊन बाईक वरील दोघे जागीच ठार झाले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. [ads id="ads1"]
या अपघातात रावेर तालुक्यातील चिनावल येथील वीरेंद्र सुनील नेमाडे वय सत्तावीस व अनिल चुडामन मेढे वय पासष्ट यांचा मृत्यू जागीच झाला. हिरो होंडा कंपनीची बाईक फॅशन प्लस एम एच एकोनाविस ए बी अकरा झिरो एक व होंडा कंपनीची ग्रे रंगाची बी आर व्ही एम एच एकोणाविस डी एम झिरो तीनशे एक्का वन या गाडीचा अपघात जबरदस्त झाला असून जागेवरच दोन जणांचा मृत्यू झाला आहे.[ads id="ads2"]
या अपघातात कार चालक एअर बॅग मुळे बचावले असून किरकोळ जखमी झाले असून त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.यावेळी सावदा सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व त्यांचे सहकारी यांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टम करता रवाना केला. यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला.