सप्रेम जयभीम समस्त भारतीय नागरिकहो आज आपल्या बापाचा '१३३ वा जन्मदिवस वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी १९१६ साली नष्टधर्मातील जातिव्यवस्थेसंबंधी कास्टाइन इंडिया:देअर ओरिजिन ॲण्ड देअर मेकॅनिझम जेनेसिस ॲण्ड डेव्हेलपमेन्ट या नावाचा प्रबंध लिहून डॉ . बाबासाहेव आंबेडकरांनी नष्टधर्मातील जातिव्यवस्थेवर घाणाघाती हल्ला केला. तो प्रबंध एक उत्तम समाज शास्त्रीय अभ्यासाचा दस्तऐवज असल्याचा निर्वाळा समाजशास्त्राच्या मान्यता प्राप्तनियतकालिकाने दिला होता. या निबंधातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जातिसंस्थेची वैशिष्टये , विकास व कार्यपद्धती याबाबत विचार मांडले आहेत . जातिच्या उत्पत्ती बद्दलचे पाशचात्य समाजशास्त्रज्ञ सेनार्ट, नेसफिल्ड, रिसलेव भारतीय समाजशास्त्रज्ञ केतकर यांच्या विचारांचा परामर्श घेऊन त्यांच्या मर्यादाही दाखवून दिल्या होत्या . तसेच ज् जातिसंस्थेच्या उत्पत्ती संबंधीची स्वतःची स्वतंत्र अशी उत्पत्ती मांडली होती.[ads id="ads1"]
त्यानंतर जातिनिर्मुलन वा उच्छेदासंबंधीस्वतःचीअभ्यासपूर्ण आणि अनुभवाधारित मते पुढे त्यांनी anihilation o F caste या ग्रथात मांडली आहेत, सन १९३६ मध्ये त्यांनी जातिव्यवस्थेचे निर्मुलन हे पुस्तक लिहिले . या ग्रंथाची पार्शवभूमी खुपरोचक आहे .हे पुस्तक म्हणजे१९३६ साली लाहोर येथील जात पात तोडक मंडळाच्या न झालेल्या वार्षिक परिषदेचे अध्यक्षीय भाषण होय .आर्य समाज कार्यकर्त्यांनी जातपात तोडक मंडळाचे अधिवेशन लाहोर येथे आयोजित केले त्या अधिवेशनाचे अध्यक्ष पद स्वीकारण्याचे निमंत्रण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारून जे अध्यक्षीय भाषण त्यांनी तयार केले त्याच्या लिखीत प्रती मडळाने मागवून घेत त्यातील काही भाग वगळण्यास सांगितला असता बाबासाहेबांनी त्यासाठी असहमती दर्शविली तेव्हा मंडळाने तेअधिवेशनच रद्द केले . तेव्हा डॉ बाबासाहेबआंबेडकरांनी ते भाषण पुस्तक रुपात प्रकाशित करून अब्राम्हणांना जागृत करण्याचा आपला हेतू पूर्ण केला . कारण आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ बोलके सुधारक नव्हते, तर ते प्रत्यक्ष कृती करणारे महामानव होते. पारतंत्र्यात बंधने असतात तर स्वातंत्र्यात मुक्ती असते, असे सर्वज्ञ चक्रधर स्वामी म्हणाले होते. या उक्तीप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामगिरीत जगणे कदापी मान्य केले नाही म्हणूनच ते म्हणतात गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल.[ads id="ads2"]
धर्माच्या नावाखाली बहुजनांचे शोषण होत होते, त्याला पायबंद घालण्यासाठी डॉ ' बाबासाहेब आंबेडकर यांनी विपूल अशी ग्रंथसंपदा निर्माण करून आपल्या ग्रंथांतून कठोर धर्मचिकित्सा केली. त्या ग्रंथसंपदेपैकीच एक म्हणजेच वर नमूदलाहोर अधिवेशनाचे अध्यक्षीय भाषण .जातिव्यवस्थेचे निर्मुलन(Annihilation of caste)होय. या पुस्तकात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्याकाळात भारत देशाच्या विविध भागांत अस्पृश्यांवर होत असलेल्या . अन्याय अत्याचाराचा परामर्श घेतलेला आहे . यात मध्यभारतातील . बलाई समुदायावर हिंदूंनी केलेल्या जुलमाची घटना असो किंवा गुजरात मधील कवठा गावात अस्पृश्य मुलांना सरकारी शाळेत नाकारलेला प्रवेश असो वा अहमदाबादेत अस्पृशानी धातूच्या घागरीने पाणी भरले म्हणून मारहाण केल्याची घटना असो तसेच जयपूर राज्यातील चकवारा गावातील एका अस्पृशाने तीर्थयात्रेवरून परतल्याच्या खुशीत अस्पृश्य बांधवांसाठी भोजन आयोजीत करून भोजनात तुपाचा समावेश केल्याने तूप खाणे ही उच्च सामाजिक दर्जाचीओळख आहे व तूप खाण्याचा उर्मटपणा या लोकांनी केला त्यामुळे शेकडो हिंदूनी लाठ्या काठ्या घेऊन त्या अस्पृश्यांवर खूनीहल्ला करत अन्नाची नासाडी केली . अशा विविध घटनांची नोंद घेऊन बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणांची बाजूसुद्धा मांडलेली आहे . वेळेअभावी आपण याठिकाणी त्याचा उहापोह करणार नाहीत डॉ बाबासाहेब आंबेडकर या क्रातीसुर्याचे विचार क्रांतिकारी आणि सडेतोड आहेत. त्यांनी लेखणीच्या व प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्या वैचारिक विरोधकांना प्रत्युत्तर दिले डॉ . बाबासाहेब आंबेडकर हे तडजोडवादी नव्हते. त्यानी कधी आपल्या विरोधकांशी हातमिळवणी केली नाही, पण माणुसकी मात्र कायम जपली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे बुद्धिवादी होते. ते अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ, इतिहासतज्ञ, घटनातज्ञ, जलतज्ञ, कृषितज्ज्ञ, धर्मशास्त्राचे अभ्यासक होते. आपल्या आयुष्यात गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानून डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी शैक्षणिक,धार्मिक आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात खूप मोलाचे कार्य केलेले आहे . त्यांचा ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध वैचारिक संघर्ष होता, पण ते ब्राम्हणद्वेष्टे कधीच नव्हते व्यक्तिगत द्वेष, आकस,कटुता त्यांनी कधीही बाळगली नाही. त्यांनी ब्राम्हणांचे अहित व्हावे अशी कधीही भूमिका घेतली नाही. ब्राम्हणांच्या हिताबरोबरच बहुजन समाजाचे हित व्हावे यासाठी त्यांचा संघर्ष होता.
डॉ . बाबासाहेब आंबेडकर हे निर्भीड आणि कणखर होते. त्यांनी संकटावर मात करून यश मिळविले. ते पलायनवादी नव्हते, तर ते लढवय्ये होते. कठीण प्रसंगी ते निराश-हताश होऊन बसले नाहीत. ते स्वाभिमानी होते, तसेच ते संवेदनशील मनाचे होते. ते जितके कर्तव्यकठोर होते, तितकेच ते विनयशील होते, परंतु विचाराबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. अशा या निस्वार्थी निर्भिड आणि परखड क्रातीसूर्य बाबासाहेब डॉ भीमराव रामजी आंबेडकर याना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
ॲड . राजेश वसंत रायमळे
( एम.ए. एल. एल.बी.)
भ्रमणध्वनी ९७६४७४२०७९