सातपुड्यात जंगल मे मंगल : देवझिरी वनक्षेत्रातील आरोपी चोपडा वनक्षेत्राच्या कस्टडीतून फरार

 


आरोपी फरार होण्याचे ग्रहण यावल वन विभागाला कायम

यावल ( सुरेश पाटील ) 

सातपुड्यातील वनसंपत्ती तस्करी प्रकरणात यावल वन विभाग कार्यक्षेत्रात वनक्षेत्रपालांसह त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ९०% संगनमत असल्याने जंगल मे मंगल असल्याचे घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. त्याचाच एक नमुना म्हणजे काल बुधवार दि.२० मार्च २०२४ रोजी देवझिरी येथील ५० वृक्षांची कत्तल प्रकरणातील आरोपी हा वन विभागाच्या कस्टडीतून फरार झाल्याने तसेच यावल वन विभागात आरोपी फरार होण्याची ही दुसरी घटना घडल्याने संपूर्ण वनविभागाच्या कामकाजाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads1"]  

         काल बुधवार दि.२० मार्च २०२४ रोजी संध्याकाळी चोपडा वन विभाग कस्टडीत ठेवलेला आरोपी कस्टडीतून फरार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने जळगाव येथे मुख्यालय असलेल्या संपूर्ण यावल वन विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.हा फरार आरोपी देवझिरी वनविभाग क्षेत्रात ५० वृक्ष कत्तल प्रकरणातील होता आणि आहे. गेल्या वर्षात अशाच प्रकारे यावल वन विभागात यावल पूर्व  वनक्षेत्रपाल पदमोर यांच्या कार्यक्षेत्रातून आरोपी फरार झाले आहेत ते अद्याप आढळून आलेले नाही.[ads id="ads2"]  

  वन क्षेत्रपाल पदमोर यांच्या विरोधात कार्यालयीन कारवाई काय झाली..? याचे गुढ रहस्य सुद्धा यावल वन विभागाच्या फायली मध्ये दडपून आहे त्याचप्रमाणे आता देवझिरी येथील आरोपी फरार झाला याचे प्रकरण सुद्धा दडपून राहणार असल्याने याकडे आता धुळे व नागपूर येथील वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले लक्ष केंद्रित करून यावल वन विभागातील जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी असे सुद्धा आता संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण सातपुड्यात बोलले जात आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️