तहसीलदार महेश पवार खाजगी पंटरमुळे लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला

 


अशाच प्रकारे एका माजी तहसीलदारसह पंटरवर लवकरच कारवाई होणार..? 

यावल (सुरेश पाटील) : येथील तत्कालीन तहसीलदार महेश पवार हे नवापूर येथे तहसील पदावर कार्यरत असताना खाजगी पंटरच्या माध्यमातून केलेल्या आर्थिक प्रतापामुळे लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकुन नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अशाच प्रकारे यावल येथील एका माजी तहसीलदारासह खाजगी पंटर आणि तालुक्यातील एका वेंडर विरुद्ध लवकरच कायदेशीर कारवाई पूर्ण होऊन गुन्हा दाखल होणार असल्याचे सुद्धा संपूर्ण जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.[ads id="ads1"]  

        याबाबत सविस्तर माहिती अशी की नंदुरबार येथील अँटी करप्शन ब्युरो पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की आरोपी लोकसेवक महेश कौतिक पवार तहसीलदार नवापूर, व आरोपी लोकसेवक जितेंद्र जयसिंग पाडवी निवासी नायब तहसीलदार नवापूर जिल्हा नंदुरबार यांना नवापूर पोलीस ठाणे गु. र.नंबर ५८४ / २०२३ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ / १२ सह भा.द.वि. १७० प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक केली.[ads id="ads2"]  

        या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या गावातील इतर १२ अशा १३ लोकांनी विरुद्ध विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता नमूद गुन्हा दाखल झाल्यानंतर विसरवाडी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तक्रारदार व इतर १२ अशा एकूण १३ लोकांना प्रतिबंधक कारवाई करणे कामी दि. २ नोव्हेंबर २०२३ रोजी नवापूर     तहसिल कार्यालय येथे समक्ष घेऊन गेले होते.त्यावेळी तहसिल कार्यालय,नवापूर येथील खाजगी इसम हनु रामा वळवी यांनी ते स्वतः तहसिल

कार्यालय, नवापूर येथे फौजदारी लिपीक असल्याचे भासवून साहेबांकडून तक्रारदार व त्यांच्या सोबतचे इतर १२ जण अशा १३ लोकांविरूध्द दाखल गुन्हयातील प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण बंद करून देण्यासाठी प्रत्येकी १ हजार

रू.प्रमाणे १३ लोकांचे एकुण १३,०००/- रूपयांची प्रथमत: लाचेची मागणी करून, तडजोडीअंती तक्रारदार यांच्याकडुन १०,०००/- रू. घेण्याचे मान्य करून लाचेची मागणी केली.यापैकी ७,०००/- रूपये आरोपी खाजगी इसम याने अगोदरच तक्रारदार यांच्याकडुन घेतले असल्याने उर्वरीत ३,००० /- रूपयांची लाचेची मागणी केल्याचे दि.०९/११/२०२३ रोजी पंचासमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत निष्पन्न झाले होते.      तसेच मागणी केलेली लाचेची रक्कम ३,०००/- रूपये आरोपी खाजगी इसम याने दिनांक २१ / ११ / २०२३ रोजी१३:३५ ते १३:४३ वाजेचे दरम्यान तहसिल कार्यालय नवापुर येथील महसुल शाखेत पंचासमक्ष स्विकारलेनंतर

लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडण्यात आल्याने त्याचेविरूद् नवापुर पोलीस स्टेशन येथे गु. रजि.नं. ५८४ / २०२३ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ (अ) सह भा.दं.वि. कलम १७० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

         त्यानंतर नमुद गुन्हयाच्या तपासा दरम्यान आरोपी लोकसेवक १. महेश कौतिकराव पवार, तहसीलदार नवापुर, २.जितेंद्र जयसिंग पाडवी,नि.ना. तहसीलदार, नवापुर व ३.अमृत चंद्रसिंग वळवी, महसुल सहाय्यक, (फौजदारी लिपीक) तहसील कार्यालय नवापुर अशा तिन्ही लोकसेवकांनी आरोपी खाजगी इसम हनु रामा वळवी यास गुन्हयातील तक्रारदार यांच्याकडुन लाच मागणी करून मागीतलेली लाचेची रक्कम स्विकारण्याच्या अपराधास प्रोत्साहन दिल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाल्याने यातील आरोपी लोकसेवक १) महेश

कौतिकराव पवार, तहसीलदार नवापुर, व २) जितेंद्र जयसिंग पाडवी,निवासी नायब तहसीलदार, नवापुर यांना दिनांक २६/०३/२०२४ रोजी २२:४८ वाजता गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने अटक करण्यात आली आहे.

सदर कामगिरी मा.पोलीस अधिक्षक,श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम,ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र,नाशिक, अप्पर पोलीस अधिक्षक माधव रेड्डी सो.,ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक व मा.नरेंद्र पवार,पोलीसउपअधीक्षक (वाचक), ला.प्र.वि.,नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीसउपअधीक्षक राकेश चौधरी व ॲन्टी करप्शन ब्युरो,नंदुरबार पथकाने केली आहे.

याव्दारे नंदुरबार जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यांत येते की,कोणत्याही शासकीय / freereate कार्यालयामध्ये कोणी अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांचे वतीने इतर खाजगी इसम लाचेची मागणी करीत असतील,तर अँटी करप्शन ब्युरो,नंदुरबार कार्यालयाशी दूरध्वनी नंबर (०२५६४) २३०००९, व टोलफ्री क्र. १०६४ वर संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस उपअधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, (समाधान एस. एम. वाघ) पोलीस निरीक्षक,अॅन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार यांनी केले आहे.

       अशा प्रकारे नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने जळगाव जिल्ह्यात अशाच प्रकारे एका माजी तहसीलदार तथा जिल्हास्तरीय अधिकाऱ्यासह मुखत्यारपत्र करून घेणाऱ्या पंटरसह एक स्टॅम्प वेंडर यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू असल्याने लवकरच गुन्हा दाखल होणार असल्याचे सुद्धा संपूर्ण जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️