यावल तालुक्यातील मोहराळा ग्रा.पं. कार्यालयासमोर बहुजन युथ पॅंथर जिल्हाध्यक्ष यांच्या बेमुदत धरणे आंदोलनाचा २ रा दिवस


यावल  (सुरेश पाटील ) तालुक्यातील मोहराळा ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी आलेल्या निधीची ग्रामपंचायत सरपंच व काही सदस्यांकडून परस्पर विल्हेवाट करून झालेला भ्रष्टाचार जनतेसमोर येऊ नये म्हणून सलग २ वर्षापासून ग्रामसभा न घेणाऱ्या व बनावट दस्तऐवज तयार करून कामकाज करणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक व काही सदस्यांवर  कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत शनिवार दि. २ मार्च  २०२४ पासून मोहराळा ग्रामपंचायत कार्यालय समोर बहुजन युथ पॅंथर जळगाव जिल्हाअध्यक्ष तथा सामाजिक माहिती अधिकार कार्यकर्ता सतीश पांडुरंग अडकमोल यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले त्यांच्या धरणे आंदोलनाचा आज दुसरा दिवस. [ads id="ads1"]  

       सतीश पांडुरंग अडकमोल यांनी दि.२४ जानेवारी २०२४ रोजी यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे तसेच दि.३० जानेवारी २०२४ रोजी  जिल्हाधिकारी जळगाव, दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी, जिल्हाधिकारी जळगाव,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे तसेच दि.२८ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पुन्हा लेखी पत्र देऊन मोहराळा ग्रामपंचायत सरपंच,ग्रामसेवक व सदस्यांवर कारवाई करणे बाबत लेखी पत्र दिले होते आणि आहेत तरी सुद्धा वरील नमूद अधिकाऱ्यांनी कार्यवाही न केल्यामुळे बहुजन युथ पॅंथर जिल्हाध्यक्ष सतीश पांडुरंग अडकमोल यांनी मोहराळा येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस असला तरी उपोषण स्थळी अद्याप कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांनी साधी भेट देऊन चौकशी केली नसल्याने आता ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. [ads id="ads2"]  

     मोहराळा ग्रामपंचायत संबंधित दिलेली तक्रार अशी --- मोहराळे ग्रामपंचायत मध्ये सन २०२० पासून गावाच्या विकासासाठी आलेल्या  निधीचा वापर सरपंच ग्रामसेवक व काही सदस्य यांनी बोगस कामे दाखवून निधीचा अपहार केला,सर्वांनी संगनमत करून कामा संदर्भात निविदा सोयीनुसार काढून बेकायदा ठेकेदाराच्या नावावर स्वतः कामे करून ठेकेदाराला काही प्रमाणात टक्केवारी देऊन मंजूर प्लॅन, इस्टिमेट प्रमाणे कामे न करता निकृष्ट प्रतीची कामे करून निधी हडप केला आहे आणि ग्रामपंचायतसाठी आलेला निधी आणि केलेल्या कामाची माहिती ग्रामस्थांना होऊ नये म्हणून ग्रामसभा प्रत्यक्ष न घेता कागदोपत्री बनावट दस्तऐवज तयार करून ग्रामस्थांची दिशाभूल केली आहे म्हणून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन तक्रार वरील संबंधित अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती परंतु गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे सतीश अडकमोल यांनी आमरण iउपोषण सुरू केले आता नेमकी काय कारवाई होणार..? याकडे संपूर्ण मोहराळा ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️