यावल ( सुरेश पाटील ) येथील महर्षी श्री व्यास मंदिराजवळील स्मशानभूमीत यावल नगरपालिके तर्फे दररोज साफसफाई होत नसल्याने स्मशानभूमीत केरकचरा साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्याचप्रमाणे अंत्यविधीसाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना बैठक व्यवस्था आहे त्या जागेची सुद्धा दयनीय अवस्था, पड-झड सुरू झाली आहे यामुळे यावलकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. [ads id="ads1"]
यावल नगरपरिषदेवर नियंत्रण असणारे वरिष्ठ अधिकारी जळगाव,प्र.मुख्य अधिकारी जामनेर,आणि संबंधित विभाग प्रमुख मुख्यालयाच्या बाहेर गावाला राहत असल्याने यावल नगरपालिकेचा कारभार दिवसे दिवस अनियमित आणि भोंगळ होत चालला आहे पर्यायी यावलकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads2"]
यावल शहरात अनेक ठिकाणी दैनंदिनरित्या साफसफाई होत नसल्याने गटारीतील घाण काढली जात नसल्याने आणि अनेक गटारीतील घाण काढल्यानंतर तात्काळ उचलली जात नसल्याने,जागोजागी बांधकाम साहित्य पळून राहत आहे, बांधकाम करताना संबंधित मालक आपल्या सोयीनुसार बांधकाम,अतिक्रमण करीत आहेत तसेच नगरपालिकेचे सर्व अटी शर्ती नियम खड्ड्यात घालीत आहेत. विविध कामे सुद्धा ठेकेदार आणि बिले काढून देणाऱ्यांच्या सोयीनुसार बोगस,निकृष्ट प्रतीची होत आहे अशाप्रकारे यावल नगरपालिकेचा संपूर्ण कारभार रामभरोसे सुरू आहे.
यामुळे मात्र आता यावलकर वैतागले असून यावल नगरपालिकेच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.