यावल येथील सिद्धार्थनगर मधील जीर्ण झालेले समाज मंदिर तात्काळ बांधून मिळण्याची समाज बांधवांची मागणी



यावल (सुरेश पाटील ) येथील सिध्दार्थनगर मधील समाज मंदिराची अवस्था अतिशय जीर्ण झालेली आहे समाज मंदिराची अवस्था इतकी जीर्ण झाले आहे की, त्यामध्ये केव्हाही जीवीतहानी होऊ शकते आणि त्या समाज मंदिरामध्ये आमचे धार्मिक व सामाजिक कार्यक्रम नेहमी होत असतात.तरी आम्हाला लवकरात लवकर नवीन समाज मंदिर शासनाच्या दलित वस्ती निधीतून किंवा शासनाच्या १५ व्या वित्त आयोग निधीतुन किंवा यावल नगरपालिकेचे मागासवर्गीय ५% निधीतुन तळ मजला,पहिला मजला आणि दुसरा मजला असे तात्काळ बांधुन मिळावे अशी समस्त बौध्द समाजाच्या वतीने लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आली. [ads id="ads1"] 

निवेदनावर माजी नगरसेवक विजयकुमार गजरे यांच्यासह कुलदीप गजरे, कैलास मेढे,शुभम गजरे, संतोष पारधे,अर्जुन अडकमोल,निलेश भालेराव, जगदीश बिऱ्हाडे ,आकाश बिऱ्हाडे, [ads id="ads2"] 

मालताबाई बिऱ्हाडे, आशाबाई बिऱ्हाडे, मुरलीधर बिऱ्हाडे, शोभाबाई  बिऱ्हाडे, तेजस्विनी बिऱ्हाडे,मधुकर बिऱ्हाडे, करण अडकमोल, पवन पारधे, गौतम पारधे, गणेश गजरे,अमृत गजरे,रुपेश गजरे इत्यादी समाज बांधवांनी आपली स्वाक्षरी करून जिल्हाधिकारी जळगाव, उपविभागीय अधिकारी फैजपूर,तहसीलदार यावल, यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन दिले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️