भुसावळ न.पा.उर्दु शाळा क्रं.२५ येथील त्या उपशिक्षक वर कारवाईची टांगती तलवार? "संबंधित यंत्रणा एक्शन मोड मध्ये ?

 


"या उपशिक्षकची सन १९९४ ची (बी.ऐ.इंगलिश)ही पदवी उत्तर प्रदेश कानपूर येथील असून,ती टायपिंग ऐवजी कम्प्युटर राईज कशी?त्यावर कानपूर विद्यापीठचा ई-मेल आयडी सुद्धा आहे.पंरतू

(होटमेल)हे सन १९९६ मध्ये जन्माला आले.व त्यानंतर ई-मेल भारतात लॉन्च झाला.तर त्या पदवीवर ई-मेल आयडी कसे आले?तसेच परप्रांतीय पदवी महाराष्ट्रात मान्य आहे का?या गंभीर गुन्हे दाखल असून,त्यास (निल)चारित्र्य पडताळणी दाखला मिळाला कसा?इतके वर्ष त्या उपशिक्षकाने ही पदवी का लपवून ठेवली?असे यक्षप्रश्न भेडसावत आहे.तरी याकडे संबंधित यंत्रणा लक्ष देतील का?" [ads id="ads1"]  

---------------------------

सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

सावदा :- गेल्या १५ फेब्रुवारी रोजी माहिती अधिकार अर्जद्वारे प्राप्त दस्तावेजांच्या आधारे तक्रादार सैय्यद जोहेब रमजान रा.भुसावळ यांनी भुसावळ न.पा. संचलित उर्दू शाळा क्रं २५ येथील उपशिक्षक तथा इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी सावदा ता.रावेर या शैक्षणिक संस्थेचे माजी चेअरमन शेख इक्बाल शेख कादर मन्यार यांची तक्रार पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे पुराव्यानिशी केली होती. [ads id="ads2"] 

या तक्रार अर्जात सैय्यद जोहेब यांनी असे म्हटले आहे की,सदर शाळेचे उपशिक्षक शेख इक्बाल शेख कादर मन्यार यांनी स्वत:चा आर्थिक लाभ करून घेणेकामी सावदा पोलिस ठाण्यात त्याचे विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असल्याची बाब जाणीवपूर्वक लपवून भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यातून स्वत:चा(नील)चारित्र्य पडताळणीचा प्रमाणपत्र प्राप्त करून तसेच कानपूर(उत्तर प्रदेशात)येथील विद्यापीठाची सन १९९४ ची खोटी व संशयास्पद पदवी न.पा.शिक्षण मंडळ भुसावळ येथे सादर करून वरिष्ठ वेतन श्रेणी वाढवून घेतलेली आहे.तरी सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी यांनी तात्काळ संबंधित प्रशासन अधिकारी यांना याची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असता या अनुषंगाने खरेखोटे काय हे उघडकीस करणेकामी कानपूर विद्यापीठात,संबंधित शाळेचे उपशिक्षक शेख इक्बाल सह मुख्याध्यापक आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन इत्यादी ठिकाणी प्रशासन अधिकारी यांनी पत्रव्यवहार करून याबाबतची माहिती व अहवाल मागितला होता.तरी या उपशिक्षक संदर्भातील सर्व माहिती जवळपास मिळण्यास सुरुवात झाली असून,याप्रकरणी भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन तक्रारदारास दिले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️