रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव व श्री.विठ्ठलराव शंकरराव नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावेर, तालुका रावेर जिल्हा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 9 मार्च 2024 रोजी महिला फिट तो इंडिया हिट कार्यक्रम रावेर येथे पार पडला. [ads id="ads1"]
यावेळी महाविद्यालयातील मा. प्राचार्य डॉ.पी.व्ही. दलाल यांच्या अध्यक्षतेखाली महिला फिट तो इंडिया हिट धावणे स्पर्धा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपप्राचार्य प्रा. एस.डी.धापसे यांचे मार्गदर्शन लाभले.भूगोल विभाग प्रमुख प्रा. सी.पी.गाढे यांच्या समन्वयाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये धावणे स्पर्धा घेण्यात आली त्यात प्रथम क्रमांक कु.राधिका संतोष चौधरी,द्वितीय क्रमांक कु. तेजस्विनी संजय महाजन, तृतीय क्रमांक कु. पूजा बाबुलाल सैनी या विद्यार्थ्यांनी पटकावले.तर त्यांचा कॅप व टीशर्ट देऊन सन्मान करण्यात आला. [ads id="ads2"]
भारत सरकारच्या युवा व क्रीडा विभाग अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव युवा अधिकारी श्री.नरेंद्र डागर सर व लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक आनंदा वाघोदे यांनी भारत सरकारच्या विविध योजना व क्रीडा याबद्दल मार्गदर्शन केले व नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून असे अनेक उपक्रम वर्षभर आयोजित केले जातात.सर्वांनी अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाला प्रा.डॉ.निता जाधव मॅडम यांचे सहकार्य लाभले महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थीनी यावेळी हजर होते.