यावल ( सुरेश पाटील ) तालुक्यातील मोहराळा ग्रामपंचायत मध्ये सुरू असलेल्या मनमानी कारभाराबाबत उपोषण सुरू असल्याने पंचायत समितीतर्फे चौकशी करून कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने दुसऱ्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले. उपोषणार्थीला लेखी आश्वासन देणे म्हणजे यावल पंचायत समितीला लोकशाहीचा दणका बसला असे तालुक्यात बोलले जात आहे. [ads id="ads1"]
बहुजन युथ पॅंथर जळगाव जिल्हा अध्यक्ष सतीश पांडुरंग अडकमोल रा. मोहराळा यांनी आपल्या मोहराळा ग्रामपंचायत मधील मनमानी कारभाराबाबत शनिवार दि. २ मार्च २०२४ पासून बेमुदत उपोषण सुरू केले होते यावल पंचायत समितीने दोन दिवसानंतर उपोषण आर्थिक यांच्या मागणीची दखल घेत सोमवार दि.४ रोजी संध्याकाळी उपोषणाचे भेट घेऊन उपोषणार्थीनी मागणी केलेल्या संदर्भात चौकशी करून योग्य तो अहवाल देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने सतीश अडकमोल यांनी उपोषण मागे घेतले. [ads id="ads2"]
उपोषण मागे घेतले असलेतरी यावल पंचायत समिती चौकशी अधिकारी तथा विस्तार अधिकारी ( ग्रा.पं. ) तडवी साहेब हे चौकशी करून वस्तुस्थितीजन्य अहवाल केव्हा देणार.. किंवा नाही..? याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.