रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी
सांगवे तालुका रावेर या गावातील सांडपाण्याचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून मार्गी लागत नव्हता पावसाळा लागला की शता शिवारातील आणि नाल्यांमधील सांडपाणी अतिक्रमण मध्ये राहणारे भिल वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरात अतिशय घाण पाणी शिरत होते. आणि डास उत्पत्ती होऊन तेथील लोक वेळोवेळी आजारी पडत होते या गरीब वस्तीतील लोकांना अनेक वर्षे आपल्या जीवनाशी संघर्ष करावे लागत होते.[ads id="ads1"]
तसेच आजपर्यंत विटवे सांगवी येथील ग्रामपंचायत ने सांगली येथील सांडपाणी काढण्याच्या विषयावर आजपर्यंत लक्ष दिले नव्हते परंतु सांगवी विटवे येथील लोकनियुक्त सरपंच मुकेश चौधरी, यांच्या लक्षात सांडपाण्याची बाब सांगवी येथील समस्त गावकऱ्यांनी लक्षात आणून दिल्यावर त्यांनी त्वरित रावेर तहसील येथील तहसीलदार बंडू कापसे आणि गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल मॅडम यांना दिनांक 28/ 3 /2014 रोजी सांगव गावात त्वरित बोलावून घेतले आणि सांडपाण्याच्या या गंभीर विषयावर माहिती दिली. [ads id="ads2"]
त्यावेळी सरपंच मुकेश चौधरी आणि ज्येष्ठ शेतकरी भागवत विश्वनाथ पाटील यांच्या सहमतीने सांगावे येथील हनुमान मंदिर ते स्मशानभूमी मार्ग अंडरग्राउंड नाली खोदून सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्यात येईल. असे सांगण्यात आले.
यावेळी तहसीलदार बंडू कापसे आणि गटविकास अधिकारी यांनीही त्वरित सांडपाणी काढण्यात यावी अशी समस्त गावकऱ्यांसमोर मान्यता दिली आहे.
त्या ठिकाणी उपस्थित मान्यवर लोकनियुक्त सांगवे विटवे सरपंच मुकेश चौधरी भागवत विश्वनाथ पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी फेगडे साहेब, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव वानखेडे, गणेश मनोरे उपसरपंच ईश्वर चौधरी, मंडळ अधिकारी शेलकर, मधुकर पाटील, विमल भिल्ल, आणि सांगवे गावातील समस्त गावकरी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.