मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : तालुक्यातील मौजे प्रिंप्री आकराऊत येथे दि.04/03/24 सोमवारी भारतीय बौद्ध महासभेची नूतन कार्यकारणीचे फलक लावीत असताना पोलीस पाटील गोपाळ अशोक सपकाळे यांनी गावातील काही समाज कंटक सोबत घेऊन बौद्ध वस्तीवर हल्ला केला आणि फालकाची मोडतोड केली. [ads id="ads1"]
याबाबत ची माहिती कळताच गावचे प्रथम नागरिक सरपंच अशोक मांगीलाल सोनवणे हे समजावण्याकरीता आले असता. त्यांना व तिथ उपस्थित असलेल्या महिला,लहान बालकांना शिवीगाळ करीत मारहाण केली. याबाबत सविस्तर माहिती घेतली असता सदर फलक गेली वीस वर्षांपासून तेथे भारतीय बौद्ध महासभेची शाखा असल्याने होता, त्या शाखेची नवीन कार्यकारणी घोषित केल्यामुळे नवीन कार्यकारणीचे फलक लावण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. [ads id="ads2"]
याबाबत पोलीस पाटील गोविंदा अशोक सपकाळे यांना कल्पना देण्यात आली होती. त्यांनी गावातील अनिल जयराम माळी,जयराज सदाशिव माळी, संदीप संजय माळी संजय उखर्डू माळी,यांना सोबत घेऊन पूर्व नियोजित कट- कारस्थान रचून गावातील सरपंचासह, महिला, बालकांना हल्ला करून मारहाण केली.बौद्ध वस्ती तील लोकांनी गावातील रस्त्याने जाऊ नये. त्याचा आम्हाला वास येतो. त्यांनी त्याचा नवीन रस्ता तयार करून गावाच्या बाहेरून ये -जा करावी. अन्यथा गावात राहू देणार नाही.अशी धमकी देण्यात आली. या धमकीमुळे बौद्ध वस्तीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .याबाबत गावात झालेली घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता तीन पोलीस कर्मचारी तिथे आले. त्यांनी पोलीस निरीक्षक नागेश मोहिते साहेब हे मुख्यमंत्रीसाहेब यांच्या दौऱ्यात असून आपण उद्या 05/03/24 मंगळवारी सकाळी 10:00 वाजता मुक्ताईनगर येथे येऊन पोलीस स्टेशनला तक्रार द्या.अशी विनंती बौद्ध वस्तीतील महिलांना आलेल्या पोलिसांनी केली. व शांतता राखण्याचे आव्हान केले. त्यामुळे सकाळी जाऊन साहेबाना भेटून तक्रार करू असे ठरले.परंतु हे प्रकरण पूर्व नियोजित असल्याने पोलीस पाटील गोपाळ अशोक सपकाळे व हल्लेखोर यांना वाटले की,आपल्यावर अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल होईल या भीतीपोटी नियोजित कटाप्रमाणे रात्रीच पोलीस पाटील व हल्लेखोरांनी तक्रार दाखल केली.सकाळी 10:00 वाजता गावातील 200 च्या जवळपास महिला व पुरुष पोलीस स्टेशनला येऊन या बाबत चे तक्रारी व पोलीस पाटील यांना कायम चे निलंबन करा असे निवेदन पोलीस निरीक्षक यांना भारतीय बौद्ध महासभेचे के. वाय. सुरवाडे, महिला जिल्हा अध्यक्ष प्रियंका अहिरे व जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष रविंद्र मोरे, तालुका उपाध्यक्ष प्रमोद इंगळे, प्रा.डॉ. संजीव साळवे, प्रकाश सरदार, पंडित सपकाळे, अनिल वानखेडे,प्रा.डॉ. संतोष थोरात यांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या प्रती संबंधित जिल्हा अधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रांतधिकारी, पोलीस उप अधीक्षक,नाशिक विभागीय आयुक्त, स्थानिक खासदार व आमदार, राष्ट्रीय नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर, मुख्यमंत्री, गृहमंत्री, अध्यक्ष नागरिक हक्क संरक्षण, अध्यक्ष अनुसूचित जाती-जमाती आयोग यांना पुढील कारवाई करिता देण्यात आल्या. या निवेदनानुसार सबंधित हल्लेखोरावर त्वरित कारवाई न झाल्यास भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल व कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाल्यास याला संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असे निवेदना द्वारे कळविण्यात आले आहे.