"सुवर्ण दिप न्यूज" च्या बातमीची तातडीने दखल :यावल नगरपरिषदेने केली तात्काळ स्मशानभूमीची साफसफाई



यावल ( सुरेश पाटील ) यावलला स्मशानभूमीतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष जनतेतून तीव्र नाराजी स्वच्छतेची मागणी असे वृत्त फक्त आणि फक्त ऑनलाइन डिजिटल काल दि.२१ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध झाले असता आज सकाळी यावल नगरपालिकेने दखल घेत तात्काळ यावल येथील स्मशानभूमीची स्वच्छता  सफाई कर्मचाऱ्यांमार्फत केली यामुळे यावल नगरपरिषदेच्या या कार्य तत्परतेबाबत, काम-काजाबाबत यावल शहरात सर्व स्तरात समाधानकारकरीत्या बोलले जात आहे.[ads id="ads1"]  

     काल संध्याकाळी ऑनलाइन वृत्त प्रसिद्ध होता बरोबर यावल नगरपालिकेने स्मशानभूमीची तात्काळ स्वच्छता केली.यासोबत यावल शहरात नगरपालिकेमार्फत गटारीचे बांधकाम आणि पाईपलाईनचे बांधकाम केल्यानंतर त्या ठिकाणी माती,दगड,गोटे इत्यादी साहित्य जागेवरच रस्त्यावर पडलेले असतात पर्यायी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो याकडे सुद्धा नगरपरिषदेने लक्ष केंद्रित करून ठेकेदाराकडून तात्काळ त्या ठिकाणची साफसफाई करून घ्यावी,कारण संबंधित कामगार मजूर आणि स्वतःला ठेकेदार म्हणून घेणारा मात्र साफसफाई करत नाही अनेक ठिकाणी आजही रस्त्यावर दगड माती पडलेली आहे याकडे सुद्धा यावल नगरपालिकेने आपले लक्ष केंद्रित करून मजुरांवर, ठेकेदारांवर कारवाई करावी तसेच यावल शहरात मोकळ्या जागांवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्याबाबत सुद्धा जनहिताच्या व आरोग्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करून साफसफाई करावी असे सुद्धा बोलले जात आहे.[ads id="ads2"]  

 सुवर्ण दिप न्युज वर वृत्त प्रसिद्ध होता बरोबर ठेकेदार  तथा प्रतिनिधी यावल नगरपालिकेत दैनंदिन नगरपालिकेतील विभाग व  संबंधित विभाग प्रमुखाच्या जवळ खुर्चीला खुर्ची लावून बसून सल्ला मसलत करून आलेल्या वृत्ताबाबत आपले वैयक्तिक मत व फक्त चर्चा करतात कार्यालयात कोणते विभाग प्रमुख आणि मुख्याधिकारी केव्हा येऊन जातात आणि कुठे राहतात याचा सोयर सुतक त्यांना नसते आणि आपला आर्थिक हेतू साध्य करून घेऊन बाकी जनहिताच्या दृष्टिकोनातून प्रसिद्धी करताना त्यांना अनेक लाचारीयुक्त आर्थिक व्यवहाराच्या उलाढालीच्या अडचणी येत असल्याने यावल नगरपरिषद मंदिरात फेऱ्या माराव्या लागतात, त्यांना असे वाटते की नगरपालिकेचा कारभार आम्हीच चालवीत आहे..? हा त्यांचा भ्रम आहे असे सुद्धा यावल शहरात बोलले जात आहे. खुर्चीला खुर्ची लावून बसणारे दोन जणांचे फोटो काल संध्याकाळी पाच वाजता प्रसिद्धी माध्यमात झळकल्याने याबाबत सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️