यावल नगरपरिषद शाखा सहाय्यक आयुक्त,मुख्याधिकारी यांची आंधळ्याची भूमिका आणि ठेकेदारांची चांदी

 


यावल  ( सुरेश पाटील ) यावल नगरपालिका कार्यक्षेत्रात विविध विकास कामे सुरू आहेत परंतु ही विकास कामे कोणत्या योजनेतून कोणामार्फत सुरू आहे. ?  किती रकमेचे काम आहे. ? याबाबतचे फलक कामाच्या ठिकाणी नसल्याने, नगरपालिकेतील बांधकाम विभागातील संबंधित शाखा प्रमुख कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहत नसल्याने गटारी,रस्ते आणि गटारीवरील ढापे हे अत्यंत निकृष्ट प्रतीचे आणि मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे न करता तसेच बांधकाम प्रमुख टेंडर भरणार संबंधित ठेकेदाराच्या नावावर त्रयस्थ बौद्धिक क्षमता नसलेले नवीन ठेकेदार प्रत्यक्ष कामा ठिकाणी बेकायदा उभे राहून मजुरांमार्फत बोगस काम करीत आहे, तसेच शहरात जलवाहिनीला एका ठिकाणी गळती लागल्याने दररोज चार ते पाच लाख लिटर पिण्याचे पाणी गटारीत वाहून जात असल्याने याकडे जळगाव नगरपरिषद शाखा सहाय्यक आयुक्त,यावल नगरपरिषद मुख्याधिकारी हे टक्केवारीमुळे तसेच राजकीय प्रभावाच्या दळपणाखाली जाणून बुजून आंधळ्याची भूमिका निभावत असल्याने यात बोगस कामे करणाऱ्या ठेकेदारांची चांदी होत आहे.याकडे जळगाव जिल्हाधिकारी लक्ष देतील का..? असे यावल शहरासह तालुक्यात बोलले जात आहे. [ads id="ads1"]  

        यावल शहरात शासकीय योजनेतून प्रभागा प्रभागात सिमेंट काँक्रेट,डांबरीकरण रस्ते,गटारी,गटारीवरील ढापे इत्यादी अनेक विकास कामे सुरू आहेत ही कामे राजकीय प्रभावामुळे मूळ ठेकेदाराच्या नावावर टेंडर मंजूर असताना, मूड ठेकेदार काम करीत  नसताना त्रयस्थ होतकरू नवीन ठेकेदार बौद्धिक क्षमता नसलेले,बांधकाम साहित्य स्वतःजवळ नसलेले अनुभव शून्य असलेले ठेकेदार काम करीत आहेत त्यामुळे अनेक ठिकाणचे ढापे निकृष्ट प्रतीचे आणि रोड लेव्हलपासून वाजवी पेक्षा जास्त उंच असे ढापे बांधकाम होत असल्याने त्या ठिकाणाहून दुचाकी चार चाकी वाहने जाऊ शकत नाही. काही ठिकाणचे ढापे पाच ते सहा महिन्याच्या कालावधीत तुटत आहेत,काही महत्त्वाच्या ठिकाणी जास्त वर्दळ आणि रहदारी असताना जाणून बुजून त्या ठिकाणी ढापे बांधकाम झालेले नाही आणि ज्या ठिकाणी कमी वर्दळ कमी वाहतूक आहे त्या ठिकाणी ढापे बांधकाम करण्यात येत आहेत.उदाहरणार्थ येथील फैजपुर रोडवर यावल तहसील पासून काही अंतरावर नगरपरिषदेच्या कॉम्प्लेक्स समोर गेल्या २ वर्षापासून ढापा तुटला आहे ( माजी नगराध्यक्ष यांच्या दुकानात समोर ) या ठिकाणी मोठी वर्दळ वाहतूक असताना ढाप्याचे बांधकाम का झाले नाही..? याला सामाजिक किंवा राजकीय द्वेश म्हणावा की व्यक्ती द्वेष म्हणावा याचे उत्तर नगरपरिषद मुख्याधिकारी आणि नवीन नवीन ठिकाणी ढाप्याचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने  उत्तर देऊन खुलासा करायला पाहिजे असे संपूर्ण यावल शहरात, व्यापारी वर्तुळात, नागरिकांमध्ये बोलले जात आहे. [ads id="ads2"]  

        यावल शहरात गटारीचे बांधकाम होत आहे या गटारीचे बांधकाम करताना मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे न करता रोड लेवल पासून गटारीची दोघं बाजूची भिंत एक ते दीड फूट उंच बांधकाम होत असल्याने ठेकेदारासह नगरपरिषद मुख्याधिकारी बांधकाम विभाग यांच्या बौद्धिक पातळीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून या ठिकाणी नगरपरिषद बांधकाम विभाग प्रमुख उपस्थित राहत नसल्याने ठेकेदाराचे बिल टक्केवारी घेऊन काढले जात आहे का..? असा प्रश्न यावलकरांमध्ये उपस्थित होत आहे.

        फैजपूर रोडवर हॉटेल पूर्णब्रह्मजवळ जलकुंभाच्या प्रमुख जलवाहिनीला गेल्या २ महिन्यापासून एका ठिकाणी गळती लागल्याने त्या ठिकाणी दररोज तीन ते चार लाख लिटर पिण्याचे पाणी गटारीतून वाहून जात आहे हे यावलच्या आंधळ्या नगरपरिषदेला आणि काही लोकप्रतिनिधी,संघटना प्रमुख,समाजसेवक म्हणून घेणाऱ्यांना आणि चमकोगिरी करून घेणारे,देणारे यांच्याबाबत सुद्धा यावल शहरात होतात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून यावल नगरपरिषदेच्या या सर्व भोंगळ आणि मनमानी, निष्क्रिय आणि कर्तव्यात कसूर  करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कारभाराबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांनी तातडीने लक्ष केंद्रित न केल्यास लोकशाही मार्गाने कायदेशीर लढा दिला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️