यावल ( सुरेश पाटील )
तालुक्यातील सावखेडासिम ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गणा बडगुजर यांनी ग्रामपंचायत क्षेत्रात अतिक्रमण केल्याचा निष्कर्ष व विवेचन चौकशीअंति दिसून आल्याने बडगुजर यांना अपात्र घोषित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जळगाव यांनी १५ मार्च २०१४ रोजी दिला. [ads id="ads1"]
ग्रामपंचायत विवाद अर्ज क्र.१७७/२०२३ प्रत्यक्ष बघितला असता ताहेर लतीफ तडवी यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार जिल्हाधिकारी जळगाव यांच्या दालनात सुनावणी व चौकशी झाली असता त्यातील निष्कर्ष व विवेचन यात आढळून आले आहे की,मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.जळगांव यांचेकडील अहवालाचे अवलोकन केले असता सावखेडा ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गणा बडगुजर यांनी सार्वजनिक जागेवर जास्तीचे अतिक्रमण केल्याचे सिध्द होत आहे. [ads id="ads1"]
याबाबत दि. २२.१२.२००६ पासून सुधारणा अंमलात आली आहे.ही सुधारणा अंमलात येण्यापूर्वी म्हणजे दि.२१.१२.२००६ पूर्वी ज्यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले होते व ते अतिक्रमण नियमित करण्यात आले होते ते अपात्र ठरणार नाहीत.तसेच अर्जदार यांनी दि.३०.०१.२०२४ रोजी प्रतिपत्राद्वारे सामनेवाला यांच्याविरुध्द तक्रार नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र सुनावणी दरम्यान सादर केलेले आहे.सदर प्रकरणी त्रयस्त पक्ष यांनी त्यांचे लेखी म्हणणे मांडले आहे.वरील विवेचन पाहता अर्जदार उस्मान रमजान तडवी यांनी तक्रार मागे घेतली असली तरी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जळगाव व गट विकास अधिकारी यांचे अहवालानुसार सामनेवाले यांनी अतिक्रमण केल्याचे सिध्द होते व सदर प्रकरणी त्रयस्त पक्षकार यांचे म्हणणे मान्य करता येत नाही. [ads id="ads2"]
त्यामुळे महाराष्ट्र ग्रामंपचायत अधिनियम १९५९ चे कलम १४-ज-३ नुसार अतिक्रमण धारक सामनेवाला हे ग्रा.पं. सदस्य म्हणून अपात्र ठरत असल्याच्या निष्कर्षात आले असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नमूद करून या आदेशाच्या दिनांक पासून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४- ज - ३ नुसार लक्ष्मण गणा बडगुजर हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यात अपात्र घोषित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जळगाव यांनी १५ मार्च २०२४ रोजी दिल्याने सावखेडासिम ग्रामस्थांमध्ये,तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात मोठी खळबळ उडाली आहे.