यावल ग्रामीण रुग्णालयात मोफत सर्व रोग निदान शस्त्रक्रिया शिबिर परंतु रुग्णांची शुद्ध दिशाभूल करून चमकोगिरी ..?


यावल ( सुरेश पाटील ) येथील ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आणि राज्य आरोग्य सोसायटीच्या वतीने ४ दिवस मोफत सर्व रोग निदान दंत व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे दि.१४ ते १७ मार्च २०२४ या कालावधीत हे शिबिर होणार असले तरी शिबिरात येणाऱ्या काही रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालयात आवश्यक पूर्ण सुविधा,आणि त्यासाठी लागणारी मशिनरी उपलब्ध नसल्याने आणि शिबिरात रुग्णांना उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन केल्याने संबंधित संपूर्ण वैद्यकीय अधिकारी हे रुग्णांची, नागरिकांची,शासनाची दिशाभूल करून स्वतःची चमकोगिरी करून शस्त्रक्रिया शिबिर सोयीनुसार करून घेत असल्याचे समोर आले आहे. [ads id="ads1"] 

        यावल येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवार दि.१४ मार्च २०२४ पासून सर्व रोग निदान दंत व शस्त्रक्रिया शिबिर सुरू होत आहे पहिल्या दिवशी रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. दुसऱ्या तिसऱ्या व चौथ्या दिवशी शस्त्रक्रिया होणार असल्या तरी यावल ग्रामीण रुग्णालयात दंत व शस्त्रक्रियेसाठी आवश्यक अत्याधुनिक मशनरी आणि डॉ. उपलब्ध आहेत का..? त्याचप्रमाणे इतर येणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का..? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. [ads id="ads2"] 

        ग्रामीण रुग्णालयात मोफत सर्व रोग निदान शस्त्रक्रिया हे महत्त्वाचे शिबिर आयोजित करताना शिबिराचे आयोजक राष्ट्रीय आरोग्य अभियान,जिल्हा रुग्णालय आणि राज्य आरोग्य सोसायटीच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेने शिबिर घेण्याचे जनतेच्या माहितीसाठी जनजागृतीसाठी काय काय प्रयत्न केले..? यावल येथील स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना बोलावून शिबिराची माहिती दिली का..? किंवा आपल्या स्तरावर माहिती देऊन मर्यादित अशी चमकोगिरी करून घेतली आहे का..? इत्यादी अनेक प्रश्न रुग्णांमध्ये नागरिकांमध्ये उपस्थित केले जात आहेत तरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिरासाठी यावल येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काय काय सूचना दिल्या आणि त्या सूचनांचे पालन स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणत्या प्रकारे केले..? याची चौकशी आणि कार्यवाही करून जनतेच्या व रुग्णांच्या माहितीसाठी पाहिजे त्याप्रमाणे प्रसिद्धी न केल्यामुळे संबंधित स्थानिक यंत्रणे विरुद्ध कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️