भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा भुसावळ यांच्याकडून भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवप्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. [ads id="ads1"]
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रश्नावली तयार करण्यात आली होती. यामध्ये शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण प्रसंग तसेच राज्याभिषेक सोहळा यांच्या तारखा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण काय विचार करतात यासारखे विविध प्रश्न यामध्ये होते.[ads id="ads2"]
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही फक्त नाच गाण्याने साजरी न करता त्यांचे संस्कार ,संस्कृती व त्यांच्या विचारांचा वारसा हा आपल्या भावी पिढीला देण्यासाठी अभाविप भुसावळ शाखेने ही प्रश्नमंजुषा आयोजित केली होती. असे मत कार्यक्रम प्रमुख तुषार जाधव यांनी व्यक्त केले.
या स्पर्धेत एकूण 314 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. अभाविप शाखा भुसावळ दरवर्षी ही प्रश्नमंजुषा स्पर्धा राबवणार आहे.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा 7 एप्रिल रोजी संतोषी माता हॉल या ठिकाणी सायंकाळी 6:30 वाजेल होणार असून विद्यार्थी व नागरिकांसाठी शिवचरित्र अभ्यासक व वेध रायगडाचा या ग्रंथाचे लेखक श्री रविंद्रजी पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शहर सहमंत्री वैष्णवी कोळी यांनी केले आहे.