नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :-- नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या लोंढरा येथे जागेच्या वादा वरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. असून यात एका जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असून चार्जिंग जखमी झाले आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील लोढरा येथे दिनांक 30 मार्च 2024 रोजी शनिवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या दरम्यान दोन गटात हाणामारी झाली. सुखदेव शिंदे, बापू शिंदे, दीपक शिंदे, विनोद शिंदे, संदीप शिंदे, आकाश शिंदे, मनोज शिंदे, प्रकाश शिंदे, भानुदास शिंदे, हिरामण शिंदे यांनी जागेच्या वादावरून विलास शिंदे, सुभाष शिंदे, जंगलु शिंदे, दादा शिंदे, सुनील शिंदे यांना कुऱ्हाड व लाठी कठीने मारहाण केली. यात विलास शिंदे यांना जास्त मार लागला असून यांची प्रकृती जास्त गंभीर आहे. तर सुभाष शिंदे, सुनील शिंदे, जंगलु शिंदे, दादा शिंदे यांना देखील मार लागला असून यांना उपचारासाठी बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आले होते. परंतु विलास शिंदे यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात घालवण्यात आले आहे.[ads id="ads2"]
सदरच्या घटनेची माहिती लोढरा येथील एका गटातील लोकांनी पोलीस औट पोस्ट बोलठाण येथील पोलीस बस्ते व त्यांचे सहकारी यांना माहिती दिली. यावरून बोलठाण पोलीस स्टेशनचे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याचे समजते.