जामनेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : येथील भिम नगर येथील बुद्ध विहीर येथे दि.01/03/24 शनिवारी महिला जळगांव पूर्वाच्या जिल्हा पदाधिकारी च्या उपस्थित जिल्ह्यातील पहिली महिला श्रामणेरी धम्मलता तायडे व प्रियंका ताई अहिरे यांचे जामनेर तालुक्याच्या वतीने वाजंत्रीसह मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.[ads id="ads1"]
त्यानंतर संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्याची कार्यकारणी ची निवड करण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व प्रथम जामनेर तालुक्याची जिल्ह्यातील पहिली महिला कार्यकारणी ची निवड करण्यात आली. त्यावेळी नाशिक विभागीय प्रभारी अध्यक्ष लताताई तायडे, राज्य संघटक के. वाय. सुरवाडे यांच्यासह जळगाव जिल्हा पूर्वच्या महिला जिल्हा अध्यक्ष प्रियंका ताई अहिरे व जिल्हा सरचिटणीस वैशाली ताई सरदार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महिला कार्यकारणी निवड प्रकिया पार पडली. [ads id="ads2"]
सर्व प्रथम कार्यक्रम ची सुरवात भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथमेच पूजन करून समुदाईक वंदना घेण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महिला जिल्हा अध्यक्ष प्रियंका ताई अहिरे यांची निवड करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील जामनेर तालुका प्रथम महिला कार्यकारणी पुढीलप्रमाणे निवड करण्यात आली तालुका अध्यक्ष मनीषा वसंत लोखंडे, सरचिटणीस संगीता मगरे, कोषध्यक्ष मनीषा दीपक लोखंडे, उपाध्यक्ष संस्कार अनिता वाघ, उपाध्यक्ष प्रचार व प्रसार अंजना मोरे, उपाध्यक्ष संरक्षण संघमित्रा खरे, सचिव संस्कार शितल इंगळे, मीना इंगळे, सचिव प्रचार व पर्यटन सुमित्रा खंडारे व सीमा मगरे,सचिव संरक्षण कल्पना सुरवाडे व उषा तायडे,कार्यलयीन सचिव मोनाली सुरवाडे, हिशोब तपासणीस सिमा मोरे,संघटक प्रचार व प्रसार सुनंदा इंगळे, संघटक संस्कार ज्योती सुरवाडे, संघटक संरक्षण रंजना सुरवाडे, संघटक छायाबाई वाघ,सुनंदा रणीत, अलका बोराडे, जिजाबाई सुरवाडे या प्रमाणे कार्यकारणीची निवड करण्यात आली. कार्यक्रम चे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीते करीता संपूर्ण जामनेर तालुका कार्यकारणी परिश्रम घेतले.