बंगळूरच्या राजीव गांधी विद्यापीठाकडून प्रिया संकपाळ यांना सुवर्णपदक

 


जयसिंगपूर(सुवर्ण दिप वृत्तसेवा) : बंगळूर येथील राजीव गांधी हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटी तर्फे घेण्यात आलेल्या फार्मसी परीक्षेत शिरोळ येथील कु प्रिया उदय संकपाळ ( शिलेदार ) यांनी सुवर्णपदक पटकावले. कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते सुवर्णपदक व सन्मानपत्र देऊन प्रिया संकपाळ यांचा गौरव करण्यात आला.[ads id="ads1"]  

           येथील क्षारपड जमीन सुधारणा संस्थेचे उदय संकपाळ यांची कन्या प्रिया हिने २०२३-२४ मध्ये धारवाड येथील सोनिया एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी येथे एम. फार्मसीचे शिक्षण घेतले असून राज्यात सर्वाधिक गुण घेत तिने सुवर्णपदक मिळवले. आई -वडील यांच्यासह विद्यापीठाचे शिक्षक व कॉलेजचे स्टाफ मेंबर्स यांचे तिला मार्गदर्शन व सहकार्य लाभले. दरम्यान , या शैक्षणिक यशाबद्दल कु प्रिया हिचा विविध संस्था व संघटनेच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️