बेलसवाडी येथे भारतीय बौद्ध महासभेचे महिला उपासिका शिबीर

 


 मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :- तालुक्यातील बेलसवाडी येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा जळगाव पुर्व अंर्तगत मुक्ताईनगर तालुका वतीने ग्राम शाखा बेलसवाडी येथे आज 01/03/24 शुक्रवार रोजी दहा दिवशीय महिला उपासिका शिबिराला सुरवात झाली. हे शिबीर दिनांक 01/03/2024ते 10/03/2024 रोजी दहा दिवसीय उपासिका प्रशिक्षण शिबीर होणार आहे या शिबीराचे उदघाटन जिल्हा व तालुक्याच्या पदाधिकारी यांच्या  उपस्थित संपन्न झाले. [ads id="ads1"]  

कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी  महिला कार्यकारणी जिल्हा संघटक भारतीताई तायडे ह्या होत्या तर प्रमुख मार्गदर्शिका जिल्हा सरचिटणीस वैशालीताई सरदार ह्या आहेत.

     तसेच या शिबिराला उपस्थित मान्यवर जिल्हा महिला सचिव आशाताई पोहेकर,जिल्हा संघटक प्रकाश सरदार,वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष दिलीप पोहेकर,तालुका संघटक संजय म्हसाने,तालुका संघटक उत्तम प्रधान,तालुका संघटक रमेश धुरंधर,संस्कार विभाग उपाध्यक्ष प्रमोद इंगळे,एस एस तायडे सर,नायगाव येथील समता सैनिक दलाचे कामंडर  [ads id="ads2"]  प्रमोद पोहेकर.,मनोज पोहेकर,मनोहर तायडे,गोविंदा तायडे,पवन वानखेडे,गोलू इंगळे,रोहन तायडे, सुलाबाई पोहेकर, शांताबाई कोचुरे, आणिताबाई पोहेकर,सुनीताबाई पोहेकर, मेघाबाई तायडे/निवेदिता तायडे  कार्यक्रमाला उपस्थित होते,सर्व प्रथम कार्यक्रम  त्रिसरण,पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,आलेल्या सर्व मान्यवरांच स्वागत करण्यात आलं. या शिबिराला शुभेच्छा दिल्या व शेवटी आभार प्रदर्शन प्रमोद इंगळे यांनी केले.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️