मार्च महाड चवदार तळे सत्याग्रह क्रांती दिन व जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन

 



 सोलापूर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सोलापुरातील निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेच्या वतीने सोलापुरातील दयानंद कॉलेज परिसर व  गुजर वस्ती या ठिकाणी पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी उपाययोजना करण्यात आली.

 20 मार्च 1927 रोजी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि ऐतिहासिक क्रांती केली. ज्या माणसाला पाण्याला स्पर्श करण्याचाही अधिकार नव्हता त्यांना हे चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी खुले केले. [ads id="ads1"] 

  या उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आपण पाहतो की ठीक ठिकाणी चौका चौकात तहानलेल्या व्यक्तींना पाणी मिळावे यासाठी  पाणपोईची सोय केली जाते. परंतु पर्यावरणाच्या सुरक्षेतेसाठी समतोलतेसाठी प्रत्येक पशु-पक्षी यांच्या जीवांचे तितकेच मोलाचे महत्त्व आहे. हे आपल्या भारतीय संविधानाने पर्यावरण सुरक्षा कायदा व वन्यजीव अधिनियम कायद्यानुसार सर्व सजीवांच्या जगण्याचा हक्क अबादित केला आहे. 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून ही साजरा केला जातो याच अनुषंगाने  आजच्या दिनी सोलापुरातील निसर्गप्रेमी तरुणांनी एकत्रित होऊन दयानंद कॉलेज परिसर व गुजर वस्ती येथे ठिक-ठिकाणी पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले आहे.  [ads id="ads2"] 

  यावेळी निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे संस्थापक भीमसेन लोकरे, भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक विजु (दा) नागमोडे, भीम युवक तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष अरुण लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्पमित्र प्रतीक डावरे या कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्पमित्र देवा सुरवसे, सर्पमित्र अशरफ शेख, सोनू गजधाने, राहुल शिंगे, खंडू रणखांबे, नासिर दालवाले, विशाल राजधाने, विक्रांत,मनोज स्वामी, सौरभ बोराडे आदींनी परिश्रम घेतले.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️