रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) - रावेर तालुका विधी सेवा समिती तर्फे दि.3 रोजी येथिल दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालया मध्ये वाघोड ता. रावेर येथिल मुळ रहिवाशी असलेल्या एका कुटुंबात वडिलोपार्जित मिलकतीच्या वाटणी वरून वाद प्रलंबित होता.[ads id="ads1"]
यावेळी विधी सेवा समितेचे अध्यक्ष व रावेर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री. पी. पी. यादव आणि वादीचे वकील ऍड. किशोर पाटील व प्रवादीचे वकील ऍड. व्ही. पी. महाजन यांच्या पुढाकारराने आपसात तडजोड होऊन दिवाणी खटला निकाली काढत वडिलोपार्जित मिळकतीत समान वाटणी करण्यात येऊन कुटुंबात झालेली दुफळी मिटविण्यात यश आले. तर प्रलंबित असलेले 41 खटले व दाखल पूर्वी तडजोड 24 खटले असे एकूण 64 खटले आपसी तडजोडीने निकाली निघाली. तसेच विविध बँका, ग्रामपंचायती, बी.एस. एन. एल. व एम. एस. ई. बी. यांची थकबाकी रुपये 22,67000 वसुल करण्यात आले.[ads id="ads2"]
यावेळी न्या. पी. पी. यादव, सरकारी वकील श्रीकृष्ण दुट्टे, वकील संघांचे अध्यक्ष ऍड.बि.डी. निळे, सचिव ऍड. किशोर पाटील, ऍड. व्ही. पी. ऍड. विपीन गडे,महाजन,ऍड. योगेश गजरे, ऍड. प्रमोद विचवे, ऍड.सुभाष धुंदले, ऍड. दिपक गाढे, ऍड. तुषार चौधरी,ऍड. उदय सोनार , ऍड. अमोल कोंघे, ऍड. निलेश महाजन,ऍड. सलीम जमलकर,ऍड. सुवर्णा रावेरकर, ऍड. संदेश पाटील, ऍड. दिपक तायडे,पंच सदस्य ऍड. परदेशी, सहाय्यक अधीक्षक बिऱ्हाडे, एल. आर. पाटील, मनोहर शिंपी, खुपसे मॅडम,डी. जि. इंगळे, आर. आर. सोनवणे, डी. एस. डिवरे, भूषण महाजन,ए. के. काळे, भरत बारी, निखिल पाटील, सतीश रावते,भगवान चौधरी, दिनेश साळी आदी वकील सदस्यांनी व न्यायालयीन कर्मचारी परिश्रम घेतले.