यावल ( सुरेश पाटील ) नगरपालिका कार्यक्षेत्रात नगरपरिषद बांधकाम विभागामार्फत गटारीवरील बांधण्यात आलेले ढापे अत्यंत निकृष्ट दर्जाचे,मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे बांधकाम होत नसल्याने ५ ते ६ महिन्यात गटारीवरील ढापे तुटत आहे, सिमेंट काँक्रीटचे काही रस्ते तसेच डांबरीकरणाच्या काही रस्त्यांवर सिल्कोट काम न केल्यामुळे कामे अपूर्ण आहेत, फैजपूर रोडवर जलकुंभाची नवीन पाईपलाईन गेल्या महिन्यापासून लिक झाल्याने दररोज पिण्याचे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.साफ सफाई स्वच्छता विभाग,वाहन विभाग घनकचरा विभागात मोठा आर्थिक घोळ आहे त्याकडे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांसह आणि काही आजी माजी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. [ads id="ads1"]
न्यू व्यासनगर मधे नगरे सर यांच्या घरासमोर तसेच गादी भांडार शेजारी गटारीवरील ढाफ्याचे बांधकाम गेल्या ५ / ६ महिन्यापूर्वी झाले तो ढापा तुटल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.याचप्रमाणे न्यू व्यास मुनी नगर उद्यानासमोर बांधलेला ढापा,भुसावळ रोडवर हॉटेल नारबाजवळ गटारीवर बांधलेला ढापा म्हणजे यावल नगरपालिकेच्या बांधकाम विभागाचा आणि ठेकेदाराचा बेआक्कलचा / नमुना दिसून येतो.याच ठिकाणी डांबरीकरणाचा रस्ता झाला त्यावर अजून ठेकेदार आणि सिल्कोटचे काम केलेले नाही. [ads id="ads2"]
तडवी कॉलनी परिसरात नवीन जलकुंभ बांधला गेल्याने नवीन टाकलेली पाईपलाईन फैजपूर रोडवर हॉटेल पूर्णब्रह्मजवळ लिक झाल्याने त्या ठिकाणी दररोज लाखो लिटर पिण्याचे पाणी गटारीत वाया जात आहे ही प्रत्यक्ष वस्तुस्थिती असताना यावल नगरपरिषद किंवा पाणीपुरवठा विभाग आंधळा झाला आहे का..? पाईपलाईन दुरुस्तीचे काम का होत नाही ऐन उन्हाळ्यात दररोज लाखो लिटर पाणी गटारीत वाहू दिले जाणार आहे का..? या पाईपलाईन संदर्भात यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत,परंतु यावल नगरपरिषद ठोस निर्णय घेऊ शकत नसल्याने यावलकरांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.
शहरात अनेक ठिकाणी मोकळ्या जागांवर आणि गटारीत घाणीचे साम्राज्य असून साफसफाई स्वच्छता विभाग आणि घनकचरा वाहतूक विभागासह नगरपालिकेच्या वाहनांमध्ये डिझेल इंधन खर्च कसा..? आणि प्रत्यक्ष डिझेल कोण कोणत्या वाहनात टाकले जाते याबाबत सुद्धा आता चर्चा सुरू झाली आहे याचे सीसीटीव्ही फुटेज पेट्रोल पंपावरून काढल्यास लक्षात येईल आणि प्रत्यक्ष अनेकांच्या लक्षात आले आहे.यावल नगरपालिकेने शासकीय योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर घनकचरा वाहतूक जेसीपी इत्यादी वाहने खरेदी करताना कसा गोड केलेला आहे याची प्रत्यक्ष वाहनाची कार्यक्षमता आणि खरेदी केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यास मोठा आर्थिक घोळ उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे यावल नगरपालिकेत स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे.