मानव सेवा ईश्वर सेवा कल्याण संघ तर्फे प्रवीण रामटेके यांचा वाढदिवस शालेय साहित्य व मिठाई वाटप करून साजरा


भुसावळ:-तालुक्यातील निंभोरा  ब्रु ( दीपनगर) येथील जि. प.शाळेमध्ये १ ली ते ४ थी मध्ये शिकत असलेल्या सर्व  गरीब  विद्यार्थांना मिठाई आणि शैक्षणिक साहित्य चित्रकला वहया आणि कलर बॉक्स वाटप करून  प्रविण रामटेके  सुरक्षा अधिकारी प्रकल्प यांनी आपला वाढदिवस साजरा केला. [ads id="ads1"]  

यावेळी त्यांच्या पत्नी सौ अलिशा रामटेके , मुली इरा रामटेके आणि द्रिती रामटेके उपस्थित होत्या. मुलांना मिठाई आणि शालेय साहित्य मिळाल्याने  त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. 

यावेळी  काही मुलांनी सुंदरसं नृत्य देखील सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य बघून संपूर्ण रामटेके परिवार यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद फुलला. [ads id="ads2"]  

जीवनात पहिल्यांदा मला वाढदिवस साजरा करण्याचा खरा आनंद झाला , खुप इच्छा होती की गरजू मुलांसाठी काही विधायक कार्य करावे, ती इच्छा आज पुर्ण झाली अशी बोलकी प्रतिक्रिया प्रवीण रामटेके यांनी बोलून दाखविली.

मानव सेवा ईश्वर सेवा संस्थेच्यावतीने सदर उपक्रम पार पडला. 

अशा या अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रमास संस्थापक मोहन सरदार, निंभोरा गृप ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी  संजय भारंबे, ग्राम पंचायत सदस्य  यासीनखा पठाण,  उल्हास बोरोले समरजितसिंग चाहेल,छगन पवार आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सरदार  आवर्जून  उपस्थित होते. 

सर्व मान्यवरांचे आभार मुख्याध्यापिका सौ सुनिता जोशी , शिक्षिका क्रांती तळेले यांनी मानले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️