सावदा येथे अस्वच्छतेबद्दल नागरिकांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब


सावदा ता.रावेर वार्ताहर (युसूफ शाह)

सावदा :- शहरातील विविध भागात नियमित साफसफाई होत नसल्याने कचरा साचला आहे. त्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांच्या आरोग्य धोक्यात आल्याने,याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे आणि परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. [ads id="ads1"] 

 त्यानंतर तात्काळ पालिकेचे अधिकाऱ्यांनी त्या परिसरात जाऊन पाहणी केली.यावेळी न.पा.स्वच्छता निरीक्षक चेतन पाटील यांनी स्वच्छता मोहीम सुरू केली जाईल आणि एस आर ग्रीनवे एम्पायर नाशिक या स्वच्छता ठेकेदारांनी काम व्यवस्थित नाही केले तर त्यांना नोटीस देण्यात येऊन कारवाई केली जाईल,असे आश्वासनदेखील दिले.तरी अस्वच्छता,ओला-सुका कचऱ्याची उचल मध्ये अनियमित्ता,व वर्गीकरण ठप्प या संदर्भात सतत सुवर्ण  दिप न्यूज मध्ये बातम्या प्रकाशित केलेले आहे.[ads id="ads2"] 

  कामात अनियमित असल्याकारणाने गेल्या ८ महिन्यात एस.आर.ग्रीनवे नाशिक या ठेकेदारास तात्कालीन मुख्याधिकारी यांनी सुद्धा नोटीसा बजावल्या असून,नवनिर्वाचित मुख्याधिकारी हर्षल सोनवणे यांनी देखील या ठेकेदारास पाच हजाराचा दंड ठोठावला आहे. पंरतू या ठेकेदाराने सावद्यात नियुक्त केलेले कर्मचारी सुद्धा शहरात कोठेच आढळून येते नाही.असे असताना ठेका रद्द करून,काळ्या यादीत टाकण्याची करवाई न करता उलट लाखोंची बिले या ठेकेदारास अदा केली जाते.हे मात्र खरे आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️