प्रतिनिधि (फिरोज तडवी)
जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद ता. प्रा. आ. केंद्र धामणगाव अंतर्गत ममुराबाद येथे अंगणवाडीतील लाभार्थीस जिल्हा पर्यवेक्षक श्री राजेश कुमावत यांचे उपस्थितीत जंतनाशक गोळी देऊन जंतनाशक मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. [ads id="ads1"]
राज्यातील कृमी दोषाचे रुग्ण शून्यावर आणण्यासाठी व्यापक नियोजन करून आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात व तालुक्यात दिनांक १३ ते २० फेब्रुवारी दरम्यान १ वर्ष ते १९ वर्ष वयोगटात राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व ता. आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे यांचे मार्गदर्शक सूचनांनुसार राबवली जात आहे.[ads id="ads2"]
प्रा. आ. केंद्र धामणगाव कार्यक्षेत्रात उपकेंद्र धामणगांव, ममुराबाद, मोहाडी व सावखेडा बु. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सपकाळ व डॉ. अभिषेक ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक राजेंद्र बारी, धनराज सपकाळे, प्रतिभा चौधरी हे मोहीम राबवित आहेत.
आज जंतनाशक दिनी १ ते १९ वर्ष वयोगटातील १०९९० लाभार्थींना (मुला- मुलींना) अंगणवाडी, प्रा. शाळा, विद्यालय व महाविद्यालयात जंतनाशक गोळ्या समक्ष खाऊ घालण्यात आल्या.
ज्या लाभार्थ्यांना किंवा बालकांना आजारी असल्यामुळे किंवा काही कारणामुळे आज जंतनाशक गोळी मिळाली नाही त्यांना मापअप राऊंड दि. २० फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.
पालकांनी जंतनाशक मोहिमेस सहकार्य करावे असे आव्हान डॉ. अजय सपकाळ यांनी केले आहे.
जंतनाशक कार्यक्रमाच्या आरोग्य पथकात डॉ. राहुल बनसोडे, प्रिया मंडावरे, निलेश पाटील, घनश्याम लोखंडे, सुनीता पाटील, जयश्री कंखरे, संगीता कोळी व एन. बी. पठाण, दीपक कोळी, सुनील कोळी, मयूर पाटील, आशिष अवस्थी, हर्षल चावरे, राजू सपकाळे, संगीता घेर, वंदना पाटील व अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक व नोडल शिक्षक आदी सहभागी होते.