रमाई जयंती निमित्ताने जाहिर व्याख्यानात प्रतिपादन
विश्वरत्न संविधान निर्माते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे उत्तुंग व्यक्तित्व सिद्ध होण्यास सहाय्यभूत ठरलेली, बाबासाहेबांच्या अर्धांगिनी धर्मपत्नी मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा त्याग संघर्ष समर्पण तमाम महिलांना प्रेरणादायक व आदर्शवत आहे असे प्रतिपादन मौ पिम्पलगाव सोनारा ता सिंदखेड़ राजा येथे रमाई उपासिका संघाच्या वतीने आयोजित मातोश्री रमामाई आम्बेडकर यांच्या १०६ व्या जयंती च्या निमित्ताने आयोजित जाहिर व्याख्यानात व्यक्त केले.
मातोश्री रमाई उपासिका संघ पिम्पलगाव सोनारा च्या वतीने आयोजित सदर जयंती सोहळा कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी आयु पंचफूला खिल्लारे होत्या तर प्रमुख उपस्थिति सरपंच ज्योति ठोसरे, प्रा केशव गवई, लोककलावन्त शाहिर मल्हारी गवई, गायक विलास गवारगुरु, राजू हिवराले, गायिका कल्पना सिरसाठ, गायिका ज्योति मिसाल, यांची विशेष उपस्थिति होती.कार्यक्रमा च्या प्रारंभी प्रा गजेंद्र गवई यांनी बुद्ध वंदना घेऊन उपस्थितांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रा गजेंद्र गवई यांना लॉर्ड बुद्धा tv चा राज्यस्तरीय बेस्ट एंकर व प्रतिनिधि म्हणून मुकनायक पत्रकार पुरस्कार 2024 मिळाल्या बद्दल नागरी सत्कार करण्यात आला.
आयोजित जाहिर व्याख्यान कार्यक्रमा त समाजप्रबोधनकार, जेष्ठ विचारवंत प्रा गजेंद्र गवई यांनी त्यागमूर्ति माता रमाई आम्बेडकर यांचा त्याग संघर्ष, जीवनगाथा समाजाप्रति असलेली भूमिका विविध प्रसंग मांडणी करून तब्बल 3 तास समाजबाँधवाना प्रबोधित केले.अक्षरशः अनेक प्रसंगा ची जबरदस्त मांडणी करून महिलांना भाऊक करून राडायला लावले.
सदर कार्यक्रमा च्या यशस्वी आयोजनासाठी मातोश्री रमाई उपासिका संघाच्या आयू स्वाति खिल्लारे, लता गवई,विद्द्या खिल्लारे , निशा गवई,रोहिणी गवई, मंगला गवई, लता जाधव, छाया गवई,रेखा गवई, अनिता खिल्लारे,ज्योतिबखिल्लारे, प्रमिला गवई,यांचे सह उपासक संघा चे प्रदीप खिल्लारे, दिलीप गवई,सिद्धार्थ खिल्लारे ,विनोद गवई,सुभाष गवई, दलित खिल्लारे,प्रकाश गवई, साहेबराव खिल्लारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमा चे प्रास्ताविक पंचफूला खिल्लारे,सूत्रसंचालन प्रदीप खिल्लारे यांनी केले तर आभार दिलीप गवई यांनी मानले.कार्यक्रमास प्रचंड संख्येने गावकरी समाज बांधव उपस्थित होते.