ईव्हीएम च्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांची एकजूट, इंडिया अगेन्स्ट एव्हीएम च्या एव्हीएम विरोधी जन परिषदेला लोटला जनसागर

ईव्हीएम हटे पर्यंत आणि बैलेट येई पर्यंत हा लढा सुरूच असनार

१७ फ्रब्रुवारी ला ऐतिहासिक इंदोरा मैदानात  बामसेफ चे राष्ट्रीय अध्यक्ष *वामन मेश्राम* यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या एव्हिएम विरोधी जन परिषदेच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेत्यांनी ईवीएम च्या विरोधात रणशिंग फुंकले, नागपुरातील इंडिया अगेन्स्ट एव्हीएम च्या वतीने ही परिषद आयोजित केली गेली. परिषदेच्या आयोजिका आणि इंडिया अगेंस्ट एव्हीएम च्या राष्ट्रीय संयोजिका *एड. स्मिता कांबळे* यांनी बीजेपी, इलेक्शन कमिशन, मोदी सरकार विरोधात या परिषदेच्या आयोजनाचे महत्त्व विशद केले. एव्हीएम द्वारे सरकार कशी मतांची चोरी करीत आहे याची देशभरातील जनतेला माहिती व्हावी या उदात्त हेतूने ही परिषद आयोजित केल्या गेली असेही त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले.[ads id="ads1"]  

परिषदेत बोलताना दिल्लीचे  आम आदमी पक्षाचे आमदार *राजेंद्र पाल गौतम* यांनी मोदी सरकार एव्हीएम च्या माध्यमातून निवळणुका जिंकत असून  आमच्यावर धर्मांध भ्रष्टाचारी सत्ता लादत असल्याचे स्पष्ट केले. ईवीएम मुळे देशाचे संविधान धोक्यात येत आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे अनुयाई अस होऊ देणार नाही असा संदेश ही त्यानी दिला. या परिषदेच्या निमित्ताने एव्हीएम च्या विरोधात एकजूट होण्याचे आवाहन त्यानी केले.[ads id="ads2"] 

दिल्ली उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील *भानू प्रताप सिंह* आवर्जून या परिषदेला उपस्थित होते. आपल्या संबोधनात त्यानी मोदी सरकार आणि इलेक्शन कमिशन याना चांगलेच धारेवर धरले. दिल्ली येथील इव्हिएम विरोधी आंदोलना नंतर मोदी सरकार चांगलीच घाबरली असून इव्हिएम च्या प्रचार प्रसारासाठी लाखो सरकारी कर्मचारांना कामावर लावल्याची माहिती त्यानी यावेळी दिली. सरकार एव्हिएम द्वारे मत चोरी करुन कशी जनतेला धोका देते हे तांत्रिक दृष्ट्या त्यांनी जनतेला पटाऊन दिले. ही दिक्षाभूमी आहे मी येथूनच सरकारला इशारा देतो आहे की एव्हिएम बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी घोषणा ही त्यांनी केली.

वरीष्ठ वकील *फिरदोस मिर्झा* यांनी एव्हीएम विरोधात बोलताना अनेक संविधानिक बाबी समोर आणल्या,  बलेट पेपर वर निवडणुका घेऊन दूध का दूध पाणी का पाणी करुन दाखवा असा इशारा त्यानी सरकारला दिला. निवडणूक आयोग हे सरकारच्या हातातील खेळणे कसे झाले याबदल माहिती यावेळी बोलतांना त्यांनी दिली. एव्हीएम विरोधातील ही लढाई आणखीच प्रखर करावी असे आवाहन या परिषदेच्या निमित्ताने त्यांनी केले.

काँग्रेस चे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते *विजय वडत्तीवार* या परिषदेंत मोदी सरकार वर चांगलेच बरसले. हिंमत असेल तर बलेट पेपर वर निवडणुका करुन दाखवा लोकसभेतील ४०० जागेची गॅरेंटी कशी हवेत उडुन जाईल आणि जनता तुम्हाला तुमची जागा दाखविल असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. यांच्या मुखात राम आणि मेंदूत नाथुराम आहे असा खोचट चिमटा त्यांनी घेतला. संविधान वाचविण्यासाठी पुढाकार फक्त आणि फक्त आंबेडकरी जनताच घेऊ शकते असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

परिषदेचे अद्यक्ष वामन मेश्राम यांनी बीजेपी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांचा समाचार यावेळी घेतला. काँग्रेस एव्हिएम च्या विरोधात का बोलत नाही, रस्त्यावर का उतरत नाही असा महत्वपूर्ण प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारने आमचे ऐकले नाही तर आम्ही एव्हिएम फोडून टाकू असा इशारा त्यांनी सरकारला दिला. बहुजन चळवळ जी माननीय कांशीराम यांनी उभी केली त्या चळवळीला कमजोर करण्यासाठी  एव्हीएम आणण्यात आली असा गंभीर आरोप ही त्यांनी केला. बेलेट पेपर वर निवडणुका न केल्यास एव्हिएम फोडण्यासाठी देशभऱ्यात १५ लक्ष कामेटी बाणवून आम्ही इव्हीम फोडून टाकू असा इशारा त्यांनी इलेक्शन कमिशन ला दिला. 

या परिषदेला संपुर्ण विदर्भातून जनता उपस्थित होती.

या परिषदेला प्रामुख्याने आमदार *सुनील केदार, माजी आमदार रमेश बंग, आवाज इंडिया चे अमन कांबळे, समता सैनिक दलाचे अड. आकाश मून, इंडिया अगेंस्ट एव्हीएम चे राष्ट्रीय निमंत्रक तसेच आवाज इंडिया चे प्रीतम प्रियदर्शी,  विश्वास पाटील,लीलाताई चीतळे,शब्भीर भाई,सतिष पेन्दाम, राजेश लांजेवार*, *एड परमार , एड, अतिक मोहमद , सुनील तलवारे* *एड आकाश खोबरे*  ,इत्यादी मंडळी उपस्थित होती, 

परिषदेच्या यशस्वीतेसाठी *आनंद पिल्लेवान,राज सुखदेवे,आनंद , राहुलरत्न कांबले, राजीव झोडापे, तेलंग,भारत लोखंडे,अजय बागड़े, जयश्री गणवीर, अड़ भावना जेठे,वर्षा शामकूले,प्रशांत शेंडे,धीरज सहारे, स्मिता मेश्राम, रोशन नांदगाये, अरुण भारशंकर,मयूरी धूपे,अतिश मेश्राम, अभय चिंचोले, ऋषभ शेंडे,टार्ज़न ढवळे, प्रफुल मेश्राम, धनराज गजभिये, संकेत शम्भरकर , विनोद बन्सोड,ज्योती संघर्ष नाईक, गौतम पाटिल, एड. आनंद मनोहर, आदेश, कशिश जीवने , सुलभ बागडे, लक्ष्मी खोब्रागडे* आदिनी अथक परिश्रम घेतले.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️