जळगाव :- नंदूरबार येथील शहादा बायपास येथे दिनांक ७ फेब्रूवारी २०२४ रोजी अत्यंत भव्यदिव्य असे जेतवन महाबुद्ग विहार तसेच भव्य बुद्धशिल्प , धम्मरथ , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , माता रमाबाई आंबेडकर यांचे स्मारक यांचा लोकार्पण सोहळा सकाळी १० वाजता आयोजित केला आहे.[ads id="ads1"]
कंबोडीया चे वरिष्ठ मंत्री उक रॅबन , कंबोडीया चे उप पंतप्रधान यांचे सहाय्यक चोम शौबिया तसेच प्रसिद्ध सिनेअभिनेते गगन मलिक त्याचप्रमाणे महाथेरो बोधी पालो , पूज्य भदंत धम्म रक्षित , पूज्य भदंत गुणरत्न हे या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत . सायंकाळी ६.०० वाजता प्रसिद्ध गायक राहुल अन्वीकर , भास्कर अमृतसागर यांचा बुद्ध , भीम गितांचा कार्यक्रम आहे.[ads id="ads2"]
या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता अण्णासाहेब रमण साळवे , प्रा. डॉ. प्रकाश भामरे , प्रा. श्रीकांत पवार परिश्रम घेत आहेत , या कार्यक्रमास महाराष्ट्रातुन हजारो नागरिक येणार आहेत , जळगाव जिल्ह्यातूनहि जनतेने मोठ्या संखेने पांढरे कपड़े परिधान करुन सहभागी व्हावे असे आवाहन साहित्तिक जयसिंग वाघ , जमनादास अहिरे , नथू अहिरे यांनी केले आहे .