मुंबई (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
देशातील 22 राज्यात प्रसारण असणाऱ्या लॉर्ड बुद्धा टीव्ही चैनल मध्ये गेल्या 13 वर्षापासून सलग वृत्तसंकलन,लाईव प्रसारण, शो एंकर म्हणून कार्यरत असलेले लॉर्ड बुद्धा टीव्ही चे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधि व शो एंकर प्रा गजेंद्र गवई यांना मुकनायक वृत्तपत्र च्या 104 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित बुद्धा प्ले एप्स च्या लॉन्चिंग समारोह मध्ये मुकनायक पत्रकार पुरस्कार 2024 ने सत्कारपूर्वक सन्मानित करण्यात आले.[ads id="ads1"]
मुंबई मंत्रालय समोरिल नरीमन पॉइंट च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित सदर भव्य समारोह च्या अध्यक्षस्थानी माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले साहेब होते तर मुख्य अतिथि भारत सरकार सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांचे सह लॉर्ड बुद्धा टीव्ही चे संचालक भैयाजी खैरकर, सचिन मून, राजू मून, विदर्भ टीव्ही चे महेश नागपुरे,मा खा सुनील गायकवाड़ पुणे, मा सनदी अधिकारी रमेश बनसोड,व्यवस्थापक संगीता मून,मीरा गावंडे यांचे सह अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिति होती.[ads id="ads2"]
प्रा गजेंद्र गवई यांनी गेल्या 13 वर्षापासून लॉर्ड बुद्धा टीव्ही साठी महाराष्ट्र भर 2200 पेक्षा जास्त गावात संविधान प्रचार व प्रसार प्रबोधनासह लॉर्ड बुद्धा टीव्ही च्या सर्व लाईव प्रसारणा मध्ये विशेष एंकरिंग, बोल इंडिया बोल,अपना विहार,मैत्री संवाद मध्ये अनेक मान्यवरांच्या प्रभावी मुलाखती ,धम्म परिषदा कवरेज सारखे विशेष कार्याची दखल घेऊन बेस्ट एंकर व पत्रकार म्हणून मुकनायक पत्रकार पुरस्कार 2024 मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी प्रा गजेंद्र गवई यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चा सम्पूर्ण इतिहास व उपलब्धी, संघर्ष यावर स्वरचित गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळविली..याप्रसंगी संचालक सचिन मून, भैयाजी खैरकर यांचेसह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन सदाशिव गच्चे यांनी केले तर आभार विनोद चांदमारे यांनी मानले.सदर पुरस्कार मिळाल्या बद्दल प्रा गजेंद्र गवई यांचे सर्व स्तरातून समाज माध्यमाद्वारे विशेष अभिनंदन व कौतुक होत आहे..सदर समारोहास देशभरातून अनेक मान्यवर उपस्थित होते.