जिल्हाधिकारी आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात महास्वच्छतेचा बोजवारा म्हणजे यावल नगरपरिषद ?


यावल ( सुरेश पाटील)

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांच्या आदेशान्वये संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आणी यावल नगरपालिका प्रभारी प्रशासक म्हणून असलेल्या आयएएस महिला अधिकारी देवयानी यादव यांच्या आणि यावल नगरपरिषद प्रभारी मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या कार्यक्षेत्रात ५ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.यावल शहरात ठराविक ठिकाणी स्वच्छता अभियान करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविला असेल परंतु यावल शहरात आजही अनेक ठिकाणी महास्वच्छता अभियानाचा बोजवारा कसा वाजला हे प्रत्यक्ष दिसून येत आहे.[ads id="ads1"]

     अभियाना अंतर्गत राज्यांचे ग्रामविकास तथा पर्यटन विकास मंत्री तथा संकटमोचक मा.ना.गिरीशभाऊ महाजन यांनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी उपस्थित राहून श्रमदान केले. परंतु यावल नगरपालिका कार्यक्षेत्रात सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विविध विकास कामांसाठी निधी आणला आणि तो खर्चही केला.अनेक कामाची गुणवत्ता दर्जा हा विषय वेगळा असला तरी यावल नगरपालिका कार्यक्षेत्रात दैनंदिन सुविधा ज्या पुरविला जात आहे त्या सुविधांचा पूर्ण बोजवारा वाजला आहे,यावल शहरात आजही विकसित भागात मोकळ्या जागांवर घाणीचे,केर कचऱ्याचे,बांधकाम साहित्याचे ढीग साचलेले आहेत,गटारीची नियमित साफसफाई केली जात नाही.झाडू मारणारे ठराविक ठिकाणी साफसफाई करतात,घंटागाडी २ दिवसाआड फिरत असल्याने नागरिकांना दुर्गंधीयुक्त,ओला व सुका कचरा घरात कचराकुंडीत ठेवावा लागत आहे. ओला व सुका कचरा याचे वर्गीकरण केले जात नाही.मुख्य रस्त्यावर,भर रस्त्यात अतिक्रमण झाले आहे आणि होत असल्याने वाहतुकीमुळे सर्व स्तरातील नागरिकांना रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.बांधकाम अभियंता कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहत नसल्याने तसेच सुरू असलेले काम मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणेच होत आहे किंवा नाही याची सुद्धा खात्री न करता ठेकेदार त्याच्या सोयीनुसार मोजमाप करून इस्टिमेट नगरपरिषद बांधकाम विभागाला सादर करतात आणि त्या दाखल मोजमाप पुस्तके नुसार बिल काढले जात आहे,ठेकेदारांच्या आर्थिक व्यवहारात टक्केवारी निश्चित ठरलेली असल्यामुळे कामे पूर्ण न करता वेळेवर बिल काढले जात आहे.[ads id="ads2"]

     भुसावल कडून येताना यावल शहरात प्रवेश करताना यावल येथे भुसावळ जुन्या नाक्याजवळ वळणावर यावल शहरातील घाण पाणी व पाईपलाईनचे पाणी एका ठिकाणी साचून मिनी बंधाऱ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असून या ठिकाणी अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे, आणि यामुळे एखाद्या वेळेस मोठी अप्रिय घटना घडू शकते हे यावल नगरपरिषद आणि बांधकाम विभागाला दिसून येत नसल्याने सुद्धा नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.हे दृश्य बघितले असता यावल नगरपालिकेने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने महास्वच्छता अभियानाचे १२ वाजविले नाही का..? आणि केंद्र व राज्य सरकार सह जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशाची पायमल्ली झालेली नाही का..? असा प्रश्न उपस्थित होत आहे..?

        नगरपालिकेवर प्रशासक राजवट असल्याने काही माजी अध्यक्ष आणि अनेक माजी सदस्य,सत्ताधारी विरोधी पक्षाचे समर्थक असले तरी ते गप्प बसून आहेत तसेच गेल्या दीड दोन वर्षापासून यावल नगरपालिका कारभार प्रशासक आणि प्रभारी कारभारामुळे ९० टक्के विस्कळीत झाला आहे. याकडे जिल्हाधिकारी जळगाव आयुष्य प्रसाद यांनी लक्ष केंद्रित करून अधिकारी कर्मचारी यांच्या कामाबाबत पोपट पंछी न करता,जास्त न बोलता प्रत्यक्ष कारवाई करावी अशी यावल शहरातून सर्व स्तरातून मागणी होत आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️