लासगाव परिसरा सह पाचोरा महसूल विभागाच्या वतीने ईव्हीएम व व्ही.व्ही.पॅड बाबतीत मोबाईल व्हॅन ने जनजागृती

 


लासगाव (ता.पाचोरा)प्रतिनिधी : पाचोरा उपविभागीय अधिकारी पाचोराभाग यांच्या आदेशाने पाचोरा भडगाव मतदारसंघा साठी एक फिरते मोबाईल व्हॅन देण्यात आलेली असून सदर वाहन नागरिकांना ईव्हीएम मशीन व्ही व्ही पॅड यांची सखोल माहिती व्हावी म्हणून देण्यात आले आहे. या व्हॅन मध्ये नागरिकांना आव्हान करण्यासाठी लाउड स्पीकरने तसेच ईव्हीएम मशीन मांडणी करण्यासाठी होल्डिंग टेबल असणार आहे. [ads id="ads1"]

  तसेच ईव्हीएम मशीन व्ही व्ही पॅड कसे कार्य करते याचे प्रात्यक्षिके प्रत्येक गावातील मतदान केंद्रावर मुख्य चौकावर नाका बाजार शासकीय कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय ही मोक्याच्या ठिकाणी मोबाईल व्हॅन घेऊन ही मशीने दाखवण्यात येणार आहेत. सदर व्हॅन ही दिनांक 5/12/2024 पासून ते 27/01/2024 पर्यंत असे 23 दिवस प्रत्येक गावोगावी ही व्हॅन  फिरत आहे मा. उपविभागीय अधिकारी भुषण अहिर भाग पाचोरा यांच्या मार्गदर्शनाने मा.तहसीलदार सो. पाचोरा संभाजी पाटील  यांच्या आदेशाने पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.[ads id="ads2"]

 या मधे सर्व मंडळ अधिकारी पाचोरा सर्व तलाठी पाचोरा सर्व कोतवाल पाचोरा. सर्व बी.एल.ओ.पाचोरा आज दिनांक ६रोजी ही व्हॅन कुरंगी ,लासगाव ,जारगाव येथे फिरून लोकांना ईव्हीं एम मशीन संदर्भात जनजागृती केली .आजचे पथक मंडळ अधिकारी नांद्रा प्रशांत पगार तलाठी लासगाव दिपक दवंगे तलाठी नांद्रा नदीम शेख व बी.एल.आओ. कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️