बुलढाणा (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
लकापूर प्रशासकीय इमारतीत महापुरुषांचे फोटो लावण्यात यावे या मागणी करिता दि.५ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुक्याच्या वतिने बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांच्या नेतृत्वात 'ठिय्या आंदोलन' करण्यात आले.[ads id="ads1"]
महाराष्ट्र सरकारच्या 2002 च्या जी आर नुसार प्रत्येक सरकारी कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावण्यासाठी आदेश काढण्यात आला होता.परंतू, बुलढाणा जिल्ह्य़ातील मलकापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात एकाही महापुरुषाचा फोटो लागलेला नाही, ही बाब वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी सजग होऊन जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, तालुकाध्यक्ष सुशील मोरे, जि.संघटक भाऊराव उमाळे, अजय सावळे, विलास तायडे यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी मलकापूर उपविभागीय कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावण्यासाठी ठिय्या आंदोलन केले.[ads id="ads2"]
याप्रसंगी महापुरुषांच्या सन्मानासाठी आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी महापुरुषांच्या नावांच्या केलेल्या जयघोषाने प्रशासकीय इमारतीचा परिसर दणाणून गेला
या आंदोलनाची एस.डी.ओ.साहेब मलकापूर यांनी त्वरित दखल घेत शासकीय कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांनी फोन करुन नायब तहसीलदार द्वारे आपल्या कार्यालयात पुढील सात दिवसांत महापुरुषांचे फोटो लावण्याचे आश्वासन दिल्याने कार्यकर्त्यांनी सुरू केलेले आंदोलन थांबवले
यावेळी नारायणराव जाधव, सम्राट उमाळे, गणेश सावळे, यासिन कुरेशी, गजानन झनके, भीमराज इंगळे, जफरखान, भीमराज मोरे, अनिल तायडे, गणेश सावळे, प्रवीण इंगळे, दादाराव वानखडे, भीमराव नितोने, प्रताप बिऱ्हाडे, संतोष इंगळे, अनिल तायडे, विनोद वाकोडे, अरबाज कुरेशी, इंगळे मामा, सनी सावळे, रविंद्र कोथळकर आदी उपस्थित होते.