सहकारात आंधळे दळताय आणि कुत्रे पीठ खाता आहे.
जळगाव : राज्यस्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या पूर्णवाद नागरिक सहकारी पतसंस्था पंचवार्षिक निवडणुकीत दाखल झालेले नाम निर्देशन पत्र बघितले असता एकूण ११ नाम निर्देशन पत्र दाखल आहे त्यापैकी ५ नामनिर्देशन पत्र हे आकोले नावाची एकाच गोतावळ्यातील असल्याने सहकारात आंधळं दळताय आणि कुत्र पीठ खात आहे असे बोलले जात आहे.[ads id="ads1"]
दि.११ जानेवारी २०२४ पर्यंत दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्राची यादी प्रत्यक्ष बघितली असता अनुक्रमे कुलकर्णी जितेंद्र कृष्णमुर्ती,शर्मा महेंद्र मनोहरलाल,अकोले अनुप सत्यशिल,अकोले शिल्पा शाम,लोखंडे वेळू गणेश,राणे नितीन शंकर,अकोले शितल सत्यशिल,राणे विजय शंकर,अकोले सत्यशिल अविनाश,अकोले शाम अविनाश,कोळी नामदेव पांडूरंग असे एकूण 11 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत उद्या दि.१२ रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार असली तरी माघारी पर्यंत यातील कोण कोण माघार घेतो याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे. [ads id="ads2"]
एकूण ११ नामनिर्देशन पत्र दाखल आहे त्यापैकी ५ नामनिर्देशन पत्र हे अकोले नावाचे असल्याने अकोले हे एकाच कुटुंबातील किंवा नातेवाईकांचा गोतावळा संस्थेत सभासद म्हणून एकत्र आला आहे का..? याबाबत तसेच दाखल नामनिर्देशन पत्र ज्यांनी दाखल केले आहे त्यापैकी काही नामनिर्देशन पत्र दाखल करणारे जळगाव जिल्ह्यात कुठे कुठे थकबाकीदार आहेत याची माहिती खुद्द सहकार विभागातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना माहिती नाही का..? आणि खोटी माहिती देत असल्याने सहकार विभाग काय कारवाई करणार..?याकडे पूर्णवाद नागरी सहकारी संस्थेचे ठेवीदार आणि अनेक सभासदांचे तसेच जळगाव जिल्ह्याचे लक्ष वेधून आहे.