चोपडा येथील "गौतम नगर अतिक्रमणधारकांसाठी वंचित बहुजन आघाडीची धाव"

 


चोपडा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : मागासवर्गीय अल्पसंख्यांकांच्या वस्त्या अतिक्रमणाच्या नावाखाली उध्वस्त करण्याचा डाव राज्य व केंद्र सरकारने आखला असून, चोपडा येथील गौतम नगर भागात 70 वर्षांपूर्वीची जुनी वसाहत दोन दिवसात खाली करा अन्यथा बुलडोझर चालवून जमीन दोस्त करू अशी धमकी वजा इशारा प्रशासनाने रहिवाशांना दिला असता[ads id="ads1"] वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील,युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जि.महासचिव योगेश तायडे,जि.उपाध्यक्ष तथा चोपडा नगरसेवक अशोक बावस्कर, संघटक बबन कांबळे यांनी तात्काळ गौतम नगर येथे जाऊन भयभीत रहिवाशांची भेट घेऊन, "प्रशासनाला तुमच्या घराच्या विटेला सुद्धा हात लावू देणार नाही,वंचित बहुजन आघाडी या लढ्यात तुमच्या सोबत खंबीरपणे उभी राहणार" असल्याचे सर्वांना आश्वस्त केले.[ads id="ads2"]

यावेळी वंचितचे समाधान सपकाळे,निलेश भालेराव,करण तायडे,ईश्वर लहासे यांच्यासह अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते व  शेकडो रहिवासी उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️