सौ वैशालीताई ताठे यांची सरपंच परिषद मुंबई , महाराष्ट्र संघटनेच्या रावेर तालुका कार्याध्यक्षपदी निवड

सौ वैशालीताई ताठे यांची सरपंच परिषद मुंबई , महाराष्ट्र संघटनेच्या रावेर तालुका कार्याध्यक्षपदी निवड

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) 

कुंभारखेडा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या सौ.वैशाली ताई विलास ताठे यांची सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र या संघटनेच्या तालुका महिला कार्याध्यक्ष पदी नियुक्ती रावेर तालुका सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी मेळावा व सत्कार समारंभ या कार्यक्रमात करण्यात आली.[ads id="ads1"]

यावेळी राज्य कोअर कमिटी प्रमुख सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र आबासाहेब सोनवणे पाटील, राज्य कोअर कमिटी सदस्य सरपंच परिषद मुंबई जे डी टिमगिरे , उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सरपंच परिषद मुंबई , राजमल भागवत, उत्तर महाराष्ट्र विभागीय महिला अध्यक्ष सरपंच परिषद मुंबई,श्रीमती सुषमा ताई देसले , जळगाव जिल्हाध्यक्ष संरपच परिषद बाळासाहेब धुमाळ , जिल्हा सचिव श्रीकांत पाटील, यांच्या प्रमुख उपस्थिती होती.[ads id="ads 2"]

तर रावेर तालुका सरपंच परिषद अध्यक्ष व पदाधिकारी सह रावेर तालुक्यातील अनेक खेड्यातील सरपंच, उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी हे मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

तसेच सर्व स्तरातील जेष्ठ   श्रेष्ठ,लोक प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक यांनी सौ वैशालीताई ताठे यांना या निवडीबद्दल त्यांचे कौतुक करुन खूप शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रम यशस्वीतेसाठी  गणेश महाजन, योगेश पाटील, प्रमोद चौधरी, संदीप पाटील, श्रीकांत महाजन, महेंद्र पाटील, अमोल पाटील, डॉ नितीन भोगे, स्वरा पाटील, सुवर्णा भोगे, चेतन पाटील, मुबारक तडवी,सर परदेशी ताई, लियाकत तडवी, सह अनेक आजी माजी सरपंच उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी रावेर तालुका यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️