साक्री (अकिल शहा): साक्री तालुका जन ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने साक्री चे तहसीलदार सोनवणे यांना निवेदन सदर करण्यात आले त्या निवेदनात असे म्हटले आहे की, सर्व कागदपत्रे सादर केल्यावर मिळालेल्या परवानगीनुसार 'लोकशाही न्यूज' ही मराठी वृत्तवाहिनी सुरू होती. परंतु कागदपत्राच्या त्रुटी सांगून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने या वाहिनीवर ९ जानेवारीपासून ३० दिवसांकरिता बंदी घातली आहे. हे माध्यम स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे त्याचा निषेध करण्यात येत आहे आणि आम्ही 'लोकशाही न्यूज'च्या पाठिशी उभे आहोत, अशी भूमिका साक्री तालुका जन ग्रामीण पत्रकार संघाने घेतली आहे .[ads id="ads1"]
यापूर्वी 'लोकशाही न्यूज' या वाहिनीने सप्टेंबर-२०२३मध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याबाबत एका चित्रफितीचे प्रसारण केले होते. त्यानंतर या वाहिनीवर प्रसारणबंदी लागू करण्यात आली होती. त्याविरोधात वाहिनीच्या व्यवस्थापनाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करून उच्च न्यायालयाने २४ तासांच्या आतच 'लोकशाही न्यूज'वरील प्रसारणबंदी उठविली होती. आता कागदपत्रातील त्रुटीचे कारण पुढे करून ३० दिवसांकरिता या वाहिनीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. अशी माध्यमांवर बंदी लादणे योग्य नाही, लोकशाही मराठी न्यूज चॅनल वरील बंदी तात्काळ उठवावी व प्रक्षेपण करण्यास अनुमती द्यावी अशी मागणी करीत केंद्र सरकार चा निषेध करण्यात आला.[ads id="ads2"]
या वेळी जन ग्रामीण पत्रकार संघाचे धुळे जिल्हा सल्लागार बापूसाहेब जी.टी.मोहिते, जिल्हा संघटक विद्यानंद पाटील, सतिष पेंढारकर, साक्री तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, उपाध्यक्ष अकिल शहा, जितेंद्र जगदाळे, खंडेराव पवार, सचिन सोनवणे, हरिष मंडलिक, कल्पेश मिस्तरी, संघपाल मोरे, ज्ञानेश्वर शिंदे आदीसह जन ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते