साक्री (अकिल शहा): मा. पोलीस अधिक्षक, धुळे श्री. श्रीकांत धिवरे सो. यांच्या संकल्पनेनुसार व मा.अपर पोलीस अधिक्षक, धुळे श्री. किशोर काळे सो. यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री ग्रामीण विभाग साक्री, श्री. साजन सोनवणे सो.यांच्या नेतृत्वात साक्री पोलीस उपविभाग कार्यक्षेत्रात साक्री, पिपळनेर, निजामपुर, धुळे तालुका, सोनगीर हया पोलीस स्टेशनसाठी स्वतंत्र दामीनी पथकाची स्थापना दि.०७/०१/२०२४ रविवारी रोजी पासुन करण्यात आलेली आहे. दामीनी पथक साक्री उपविभाग या कार्यक्षेत्रात कार्यरत आहे.[ads id="ads1"]
साक्री उपविभागातील मुलामुलींमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी. पोलीस काका तसेच पोलीस दिदी या उपक्रम अंतर्गत शाळा, कॉलेज येथे भेट देवून मुलींमध्ये जन-जागृती केली जात आहे तसेच त्यांचेसाठी केले असलेले पोक्सो कायदा, स्वतःचे रक्षण कसे करावे याबाबत हे पथक मार्गदर्शन ही करित आहे. तसेच डायल ११२ व प्रसार माध्यमांचा वापर कसा करावा त्यामुळे काय परिणाम होतात आणी शाळेत जाणाऱ्या मुला- मुलींसाठी रस्त्याने छेड काढणारे टवाळ मुलांवर कारवाई केली जात आहे, सोन साखळी चोर यांचेवर कारवाई केली जाईल तसेच महीलांचे अन्याय अत्याचाराचे गुन्हे, हरविलेल्या महीलांचा शोध घेणे, कौटुबिक हिंसाचाराबाबत जागृती इत्यादी बाबत दामीनी पथक मार्गदर्शन करीत आहे. तसेच बस स्टॅण्ड, गर्दीचे ठिकाणे, शाळा, महाविद्यालय परिसरात गस्त घालीत आहे सदर पथकात पोहेका/४४२ ईला एस. गावीत, मापोशि/१७४२ रोहीनी आर. सुर्यवंशी, मपोशि/२५९ प्रियंका एन. मोरे हे कामकाज पाहत आहे.[ads id="ads2"]
दि.२० जानेवारी शुक्रवारी रोजी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर बस स्टँड येथे दामिनी पथक गस्त घालीत असताना काही टवाळखोर युवक सिगारेट ओढीत असताना आढळून आले यावेळी दामिनी पथकातील पो.हे.कॉ/ईला.एस.गावित, पो.कॉ./ टी.आर.पाटील, पो.कॉ./ कविता झोडगे यांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेत शिक्षा म्हणून उठबश्या काढायला लावल्या व सक्त ताकीद देत सोडून दिले तसेच काही युवकांचे डोक्यावरील केस वाढलेले निदर्शनास येताच त्यांना मेन्स सलून येथे घेवून जावून त्यांची कटिंग करुन घेतली त्यांच्या या कामगिरीचे परिसरातील नागरिकांकडून विशेषतः महिला वर्गांकडून कौतुक केले जात आहे.
दामिनी पथकाबाबत पोलीस प्रशासनाकडून केलेल्या आव्हानाला नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.