परसाडे ग्रामपंचायतींचा राजकीय वाद गेला विकोपाला : ग्रामपंचायतीला लागले ग्रहण


यावल-प्रतिनिधी (फिरोज तडवी)

यावल तालुक्यातील पंचायत समितीच्या परसाडे गावाच्य ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच व तीन ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची शक्यता नागरिकांतून   एकच चर्चा, असुन याबाबतची चौकशी पुर्ण झाली असुन संबंधीत अहवाल काय प्राप्त होईल याकडे ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे.[ads id="ads1"]

 परसाडे तालुका यावल या ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणुक ही सुमारे एक वर्षापुर्वी पार पडली आहे. या निवडणुकीत विजयी झालेल्या लोकनियुक्त सरपंच मिना राजु तडवी यांनी अतिक्रमण केल्याच्या कारणांवरून त्यांचे पदा धोक्यात आले आहे. कारण महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५८चे कलम १४ ( ज१ ) व १६ प्रमाणे ज्या व्याक्तीला १२ / ९ / २००१ दोन पेक्षा अधिक मुले असतील अशा व्यक्तीला निवडणुक लढविता येत नाही. यातच परसाडे येथील सन २०२१या वर्षात पार पडलेल्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य म्हणुन मदीना सुभेदार तडवी, रमजान छबु तडवी व खल्लोबाई युनुस तडवी या तिन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांना तिन किंवा तिन पेक्षा अधिक अपत्य असतांना यांनी,निवडणुकीच्या अटीशर्ती व तरदुतीचा भंग त्या निवडणुक लढवुन विजयी झाल्या आहे.[ads id="ads2"]

या बाबत सिकंदर ईस्माईल तडवी व छब्बीर कान्हा तडवी दोघ राहणार परसाडे तालुका यावल यांनी दिनांक ३ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे वरील ग्रामपंचायत सदस्य या निवडणुकीत अटी-शर्ती व तरदुतीचा भंग करून निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. या तिन्ही ग्रामपंचायत सदस्या अपात्र करण्यात यावे अशी मागणी केली असता,या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी सदर च्या तक्रारी संदर्भात सावखेडा सिम मंडळ अधिकारी यांनी याबाबतची चौकशी केली आहे.

वरील तिघ ही ग्रामपंचायत सदस्यांना आज म्हणजेच दिनांक ८ जानेवारी रोजी ११ वाजता परसाडे तलाठी कार्यालयात म्हणणे मांडणे कामी पुराव्यासह हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान लोकनियुक्त सरपंच मिना राजु तडवी यांचे विरूध्द छब्बीर कान्हा तडवी यांनी दिनांक ३ / १० / २०२२ रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दिलेल्या तक्रारीमुळे दिनांक ३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये गटविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणुन विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, भुमिअभिलेख विभागाचे अधिकारी डी. एस. हिवाळे व मंडळ अधिकारी यांच्या प्रतिनिधी तलाठी करिश्मा तडवी यांच्या संयुक्त पथकाने सरपंच मिना तडवी यांच्या अतिक्रमणीत घराची शासकिय मोजणी केली आहे. या मोजणीचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्या दप्तरी पाठवले जाणार असुन, यावर सरपंच आणी तिन सदस्य यांच्या अपात्रतेवर लवकरच  जिल्हाधिकारी  काय निर्णय घेणारा यावर सर्वांचे लक्ष वेधून आहे.

दरम्यान, या संदर्भात परसाडे येथील सरपंच मीनाताई तडवी यांनी सांगितले की, आमच्या विरूध्दच्या तक्रारीची अगदी प्राथमिक चौकशी सुरू आहे. यात आम्हाला अजून फक्त नोटीस मिळालेली आहे. यामुळे अपात्रतेचा कोणताही विषय नाही. आमच्या सहकार्‍यांना देखील नोटीस मिळालेली असल्याने हा सर्व विरोधकांचा खोडसाळपणा आहे. या सर्व प्रकरणात आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देत असल्याचे त्यांनी सांगीतले, मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून  काय सत्य बाहेर पडलेजिल्हाधिकारी यांच्या निर्णयावर अवलंबून आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️