बुलढाणा (प्रतिनिधि): भारतीय प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सवनिमित्त संयोजक चंद्रकांत खरात आयोजित भारताचे संविधान ग्रंथ व उद्देशिका वितरण समारोह कार्यक्रमा त लॉर्ड बुद्धा टीव्ही चे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधि तथा शो एंकर प्रबोधनकार प्रा गजेंद्र गवई यांनी महाराष्ट्रातील 2200 गावात मेरा गाव..भारत का संविधान..करेगा आदर्श गाव का निर्माण या शो अंतर्गत भारताचे संविधान बाबतीत विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करून संविधान प्रचार केला म्हणून संविधान प्रसारक म्हणून विशेष सन्मान करण्यात आला .[ads id="ads1"]
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण चंद्रकलाबाई देवचंद मोकळ मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद देऊळगावराजा होते तर विशेष उपस्थिति मा. डॉ शशिकांत खेडेकर माजी आमदार सिदखेडराजा विधानसभा श्यामजी धनमने तहसीलदार देऊळगाव राजा, डॉ .रामप्रसादजी शेळके सचिव राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल,मनोज कायदे जिल्हा परिषद सदस्य बुलढाणा मोहम्मद सिद्दिकी जी अध्यक्ष अंबर मसाले प्रा लि देऊळगाव राजा,डॉ प्रवीणजी वानखेडे वैद्यकीय अध्यक्ष ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा, मधुकरजी जाधव साहित्य मराठी विभाग प्रमुख व्यंकटेश महाविद्यालय देऊळगाव राजा, ॲड. विजयजी सुनगत विधीज्ञ ,पत्रकार रामदास कहाले, प्रवीण काकड़े, राहुल धोटे,विकास गवई यांची विशेष उपस्थिति होती.[ads id="ads2"]
या प्रसंगी आयोजक चंद्रकांत खरात यांनी शाला, महाविद्यालय विद्द्यार्थी, शिक्षक, प्राद्यापक,सामाजिक कार्यकर्ते यांना 1000 भारताचे संविधान ग्रंथ व संविधान प्रस्ताविका फ्रेम मान्यवरांच्या हस्ते वितरित केल्या. या प्रसंगी उपस्थित मान्यवर यांनी भारताचे संविधान, निर्मिति, कलमे, तरतूदी, नागरिकांचे हक्क, अधिकार, कर्तव्ये,या बाबत विचार व्यक्त केले.
सत्कारास मनोगत व्यक्त करताना संविधान प्रसारक प्रा गजेंद्र गवई यांनी आपण फक्त स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी राष्ट्र ध्वज फड़काऊन भारतीय होतो परन्तु दुसऱ्या दिवशी आपपल्या धर्मात व जातित परत जातो त्यांमुळे देशाची एकात्मता व अखंडता जपतो काय्य?या बाबत प्रत्येक भारतिय नागरिकांनी आत्मचिंतन करने गरजेचे आहे. असे मत व्यक्त करून अध्यक्षीय भाषण नन्तर संविधान प्रस्ताविका सामूहिक वाचन करून समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंधले सर यांनी केले तर आभार संयोजक चंद्रकांत ज्ञानदेव खरात महाराष्ट्र शासन सामाजिक युवा पुरस्कार प्राप्त तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य बुलढाणा यांनी मानले.
कार्यक्रमास भूसंख्येने नागरिक उपस्थित होते.