रावेर येथील भारत गॅस मधील कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा (उज्वला योजनेपासून) हजारो ग्राहक वंचित

 

रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद हरी कोळी)

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुका येथे भारत गॅस मधील कर्मचाऱ्यांच्या कामचुकार व हलगर्जीपणामुळे उज्वला योजने पासून हजारो ग्राहक वंचित झाले आहेत, उज्वला योजना ही शासनाची योजना आहे .ही योजना गरीब लाभार्थ्यांसाठी शासनाने दिलेली आहे. ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी भारतभर प्रयत्न केले जात आहेत. परंतु, काही गॅस एजन्सी मुळे गरीब लाभार्थी कुटुंबांना उज्वला योजनेपासून वंचित राहावे लागत आहेत, त्यातील रावेर येथील भारत गॅस एजन्सी आहे भारत गॅस मधील कर्मचारी गरीब लाभार्थ्यांना उडवा उडवी चे उत्तर देत आहेत.[ads id="ads1"]

  (उज्वला योजना) केव्हा सुरू झाली ,आणि मुदत केव्हा संपली ,हे फक्त भारत गॅस मधील कर्मचाऱ्यांना माहीत असते. सामान्य नागरिकांना नाही, सामान्य नागरिक उज्वला योजनेची नोंद करायला गेले असता, त्यांना कर्मचारी उडवा उडवी चे उत्तर देत आहेत आणि हाकलून लावत आहेत, किंवा उज्वला योजनेचे मुदत संपली आहे अशाप्रकारे दिशाभूल करीत आहेत.[ads id="ads2"]

तसेच भारत गॅस मधील कर्मचारी आपले नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांना तर पैसे घेऊन उज्वला योजनेचा लाभ तर दिला जात नाही ना?  असा सवाल रावेर तालुक्यातील संतप्त नागरिकांकडून होत आहेत याला सर्वस्व जबाबदार भारत गॅस की ,प्रशासन? अशी सुद्धा रावेर तालुक्यामधील नागरिकांकडून बोलले जात आहेत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️