भुसावळ: जामनेर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसंच शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडी मध्ये जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील व युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे.[ads id="ads1"]
काँग्रेसचे माजी जामनेर तालुका उपाध्यक्ष अँड.राजू शिवाजी मोगरे-पाटील,वाघारी येथील भाजपाचे मा.सरपंच संदीप लोखंडे,शिवसेना(उबाठा) विभाग प्रमुख योगेश गोसावी यांच्यासह जामनेर विधानसभा मतदारसंघातील शेकडो बहुजन वर्गातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश असून आगामी काळात जामनेर विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक बांधणी करून आगामी सर्व निवडणुका अधिक भक्कमपणे लढवण्याचा निर्धार प्रवेशकर्त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.[ads id="ads2"]
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील,युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार,जिल्हा उपाध्यक्ष राहुल इंगळे,महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव वंदना आराक,जिल्हा संघटक बबन कांबळे, जिल्हा संघटक ईश्वर लहासे महिला ,आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मीरा वानखेडे,युवक आघाडीचे जिल्हा सचिव मोहन पाटील, जामनेर तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव,भुसावळ ता.महासचिव गणेश इंगळे,उपाध्यक्ष निलेश जाधव,जामनेर ता.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जोहरे ,करन तायडे-रावेर यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा महासचिव एडवोकेट योगेश तायडे यांनी केले.