रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सविस्तर वृत्त असे मोयखेडा दिगर तालुका जामनेर जि. जळगांव येथिल बौध्द सरपंच पती समाधान मेढे यांची संशयास्पद हत्या करण्यात आली असून आजपर्यंत 8 ते 10 दहा दिवस होऊन ही समाधान मेढे यांच्या हत्या प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने सदर गुन्हयातील आरोपी विरोधात तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी. [ads id="ads1"]
व सदर गुन्ह्याचा तपास हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा या मागणी साठी रावेर तालुका बौद्ध समाजाच्या वतीने दि. 29/01/2024 वार सोमवार रोजी भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रावेर येथे ठीक 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. अशा स्वरुपाचे निवेदन रावेर तालुका बौद्ध समाजाच्या रावेर पोलिस स्टेशनला देण्यात आले.