मुस्लीम खाटीक समाजाचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न : 26 जोडपी झाले विवाह बद्ध

शांत , सुखी, संपन्न, भारतासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत - डॉ . मुफ्ती हारुण नदवी .

मुस्लीम खाटीक समाजाने शैक्षणीक क्रांती करावी .- सादिक खाटीक

नंदुरबार  ( प्रतिनिधी )
                शांत , सुखी, संपन्न भारतासाठी सर्वांनी डोळसपणे प्रयत्न करावेत असे आवाहन मुस्लीम खाटीक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष  डॉ . मुफ्ती हारुण नदवी यांनी केले तर मुस्लीम खाटीक समाजाने सामुदायीक शक्तीतून शैक्षणीक क्रांती करावी .असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केले.[ads id="ads1"]
                मुस्लीम खाटीक समाज व सेवाभावी संस्था नंदुरबार यांच्या वतीने बादशहा नगर येथील सामाजीक सभागृहात संपन्न झालेल्या २६ जोडप्यांच्या सामुदायीक विवाह सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ .मुक्ती हारुण नदवी आणि सादिक खाटीक बोलत होते .
                सुमारे पंधरा हजार स्त्री, पुरुष, युवक, युवती, अबालवृद्ध यांच्या प्रचंड उत्साहात संपन्न झालेल्या या सामुदायीक विवाह सोहळ्यासाठी मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्रप्रदेश इत्यादी सह देशातील अनेक ठिकाणांहून लोक आले होते विविध सामाजीक शैक्षणीक राजकीय व्यावसायीक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून सर्वांना शुभेच्छा दिल्या.[ads id="ads2="]
                अत्यंत साधेपणा आणि नाममात्र खर्चात केला जाणारा निकाह अल्लाहताला ना पसंद आहे. अशा पद्धतीने केलेल्या लग्नाचे नव वधु वराला अनंत फायदे मिळतात याचे दाखले देत मुस्लीम खाटीक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ . मुफ्ती हारुण नदवी यांनी आपल्या मार्गदर्शनात सामुदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन करणारे, त्यासाठी श्रमणारे, तसेच नवजीवन सुरू करणारे नवदांम्पत्य आणि उपस्थित हजारोंना मनस्वी शुभेच्छा दिल्या . पवित्र कुराणच्या पहिल्याच आयत मध्ये अल्लाहतालानी इल्म, शिक्षण आत्मसात करण्याचा आदेश दिला आहे . तुम्ही मटन विका, चिकन विका, काही ऐब नाही . तथापि मुलाबाळांना उत्तम दर्जाचे शिक्षण - तालीम दया. असे स्पष्ट करून डॉ मुफ्ती हारूण नदवी यांनी, तरुणाईला नशा गुटख्या पासून दूर राहण्याचा सल्ला दिला. आणि वधु वर २६ जोडप्यांचा विवाह विधी त्यांनी पार पाडला .
                धर्मांतरीत नवबौद्ध बांधवांना पूर्वी दिले जाणारे अनुसुचित जातीचे आरक्षण पुन्हा देण्यासाठी घटनादुरुस्ती केली जाते . त्याच न्यायाने मुस्लीम खाटीक वगैरे मुस्लीम मागासांना दिले १९३६ ते १९५० पर्यत जाणारे अनुसूचित जातीचे आरक्षण  धर्मांतरीत नवमुस्लीमांना पुन्हा देण्यासाठी घटना दुरुस्ती करून केंद्राने न्याय द्यावा . यासाठी राज्यसरकारने तातडीने प्रस्ताव पाठवावा असे आवाहन करून सादिक खाटीक यांनी, सर्व क्षेत्रातले शिक्षण हेच, उपेक्षित, वंचित, मागास, मुस्लीमांच्या सर्वांगीण, चौफेर, विकास, जीवन परिवर्तनाचा मुख्य शस्त्र - सुत्र आहे . दुनियादारीतील  शिक्षणासाठी सर्वच धार्मिक व्यवस्थांचा उपयोग करून घ्यावा, लाखोंच्या उपस्थितीतील संपन्न होणाऱ्या मोठमोठ्या इस्तेमां मध्ये धार्मीक शिक्षणा व्यतिरिक्त इतर अनेक विषयांवर उहापोह, चर्चा, मार्गदर्शन करण्याची नव्याने सुरुवात केली जावी . अशीही भूमिका सादिक खाटीक यांनी यावेळी व्यक्त केली .
                सामुदायीक विवाह सोहळ्यात सहभागी सर्वांना शुभेच्छा देवून नंदूरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मुस्लीम खाटीक समाजाच्या समाज मंदिरासाठी नगर पालीकेच्या माध्यमातून जागा व निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले . 
                महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश मुस्लीम खाटीक समाजाचे अध्यक्ष आणि आजी माजी पदाधिकारी त्यामध्ये सर्वश्री अध्यक्ष युसूफ खाटीक, माजी अध्यक्ष एल . ए . शेख, हाजी नबादादा, हाजी अरीफभाई, डॉ. रौफ खाटीक, शेरू हाजी, हाजी अजिजभाई, शरीफभाई, शकील कुरेशी सर ,अन्वर खाटीक, युवा अध्यक्ष आदिल खाटीक, अनस उर्फ गोलु आरिफ खाटीक, शाहीन डॉ . रौफ खाटीक , हज्जन अफसाना आरीफ खाटीक इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते . स्वागत प्रास्तावीक सुत्रसंचालन डॉ . रौफ खाटीक, फारूक खाटीक यांनी केले . शेवटी शेरू हाजी यांनी आभार मानले .

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️