राष्ट्रसंत गाडगे महाराज समाजरत्न पुरस्कार 2023-24 ने प्रा. गजेंद्र गवई सन्मानित


साखरखेर्डा येथे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव 

बुलढाणा  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) दिनांक 30 डिसेंबर रोजी अनिकेत सैनिक स्कूलमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,

साखरखेर्डा येथील मातोश्री बु. वत्सलाबाई गवई शैक्षणिक संस्था दैनिक सारथी व चौफेर दर्पण यांच्यावतीने ,सावित्रीबाई फुले जयंती दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांमध्ये साहित्य शिक्षण कलाकृती महिला सन्मान उत्कृष्ट शेतकरी अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना यावेळी ,माजी मंत्री तथा सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार  राजेंद्र शिंगणे,शेतकरी नेते रविकांत तुपकर,यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.[ads id="ads1"]

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जी. प. उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामभाऊ जाधव,कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून ललित अग्रवाल,तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून साखरखेर्डा गावचे सरपंच सौ सुमनताई सुनील जगताप ह्या होत्या,तर प्रमुख उपस्थिती म्हणून समाज भूषण अर्जुन गवई ,साखरखेर्डा उपसरपंच सय्यद रफीक राष्ट्रवादीचे चिखली तालुका अध्यक्ष गजानन वायाळ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल तुपकर,मा . पंचायत समितीचे उपसभापती सुनील जगताप,माजी सरपंच कमलाकर गवई,माजी सरपंच दाऊद कुरेशी,व्हॉइस ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष संतोष गाडेकर,ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप दादा मोरे,युवा नेते शुभम राजपूत,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमोल मोरे,वंचित आघाडीचे विशाल गवई,भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब देशपांडे,ठाणेदार स्वप्निल नाईक,तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष मंडळकर ' संग्रामसिंग राजपूत, अमित जाधव , अरुण देशमुख ,माजी समाज कल्याण सभापती अभय चव्हाण बी .सी चव्हाण सरउपविभागीय पोलीस कार्यालयाचे पवार,युवा नेते विनोद क्षीरसागर,रामदाससिंग राजपूत,शेती विषयक अभ्यासक ज्ञानेश्वर खरात पाटील,हिवरा गलडिंग, सरपंच भरत कुमार खरात,प्रदीप तुपकर,डिजिटल मीडियाचे एकनाथ माळेकर,तोताराम ठोसरे नितीन ठोसरे,शिंदी गाव चे तंटामुक्तीचे अध्यक्ष शेषराव बंगाळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक दिलीप बेंडमाळी संतोष खरात,पं . स . मा .सभापती गजानन बंगाळे,माझे बाजार समितीचे सभापती सुरेश तुपकर,ग्रामपंचायत सदस्य संदीप खिल्लारे सुभाष गवई सर सुधाकर गवई दिलीप इंगळे,संदीप देशमुख,वुमन गावचे सरपंच भीमराव खिल्लारे, दिनकर काळे,बबन सरकटे,राधेश्याम काळे राजीव जाधव विठ्ठल राठोड रावसाहेब वायाळ राहुल डोंगरदिवे,समाधान सरकटे,नंदकिशोर कोतवाल,ग्राहक समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ गंगाराम उबाळे ,महिला जिल्हाध्यक्ष किरण ताई वाघ,सुनील इंगळे,निवृत्ती खरात,संजय निकाळजे,पंजाबराव हाडे अहमद कुरेशी यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.[ads id="ads2"]

सर्वप्रथम सरपंच सौ सुनील ताई जगताप यांच्या हस्ते फीत कापून पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले,त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले,आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत स्वागताध्यक्ष ललित  अग्रवाल यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले ,त्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सचिन खंडारे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणांमधून पुरस्कार सोहळ्याची महती विशद केली,त्यानंतर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करण्यात आली,

 लॉर्ड बुद्धा टीव्ही चे जिल्हा प्रतिनिधि तथा शो एंकर प्रा गजेंद्र गवई गेल्या 30 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय संविधान प्रचार व प्रसारक म्हणून 2200 पेक्षा जास्त गावात संविधान जनजागृति सह केंद्र व महाराष्ट्र शासनानाच्या विविध लोककल्याणकारी योजना, प्रकल्प , कार्यक्रम उपक्रम यशस्विपने राबवित आहेत, शासनाच्या अनेक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करून लोकांना पाणी, आरोग्य, स्वच्छता, पानलोट, वृक्षारोपण, संवर्धन, पर्यावरण,पंचायतराज, युवा,महिला सक्षमिकरण, मातिपरिक्षण,शेतकरी प्रबोधन यासारख्या विविध विषयावर अविरतपने कार्य करत आहे त्यासाठी चा समाजसेवा, सांस्कृतिक, पत्रकारिता ई क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सदर  माजी मंत्री तथा आमदार डॉ राजेन्द्र शिंगणे , शेतकरी नेते रविकांत तुपकर तथा मान्यवारांच्या  हस्ते पुरस्कार सोहल्यात समाजकार्यातिल विशेष सन्मान म्हणून"राष्ट्रसंत गाडगेबाबा समाज रत्न पुरस्कार 2023-24"  युवा लोकशाहीर प्रबोधनकार  शाहीर प्रा गजेंद्र गवई यांना देण्यात आला,

त्यानंतर शाहीर गजेंद्र गवई यांनी  फौजी अर्जुन गवई यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने स्वरचित विशेष गीत प्रभावी आवाजात बाहरदारपने सादर करून उपस्थितांची दाद मिलविली यावेळी उपस्थित सर्वांनी अभिनन्दन करून कौतुक केले,

 यापूर्वी सुद्धा गजेंद्र गवई यांना राष्ट्रीय, राज्य, जिल्हा तालुका स्थानिक स्तरावर 218 च्या पेक्षा अनेक मान, सन्मान, पुरस्कार प्राप्त झाले आहेत.सदर पुरस्कार सन्मान मिळाल्या मुळे राज्यभरातून अभिनन्दना चे वर्षाव हॉट आहेत.

पुरस्कार हा भावी पिढीला प्रेरणा देणार असून जो व्यक्ती चांगले काम करतो त्यामध्ये काडया करण्याचे काम काही लोक करतात त्यांनी करू नये,हा पुरस्कार सोहळा दरवर्षी आयोजित करून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील होतकरूंना ऊर्जा देण्याचे काम करावे अशी त्यांनी सांगितले,

त्यानंतर आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी पुरस्कार सोहळ्याचे कौतुक केले ते आपल्या भाषणात म्हणाले की आपल्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये एवढे उत्कृष्ट शेतकरी असेल शिक्षक असेल कलाकार असेल साहित्यिक असतील अशा सर्वांचा मान सन्मान पुरस्कार देऊन केला खऱ्या अर्थाने उपेक्षित घटकांना न्याय मिळाला ,हा पुरस्कार सोहळा दरवर्षी साजरा करण्यात यावा,पुरस्कार मिळाला म्हणजे कामाचे जबाबदारी वाढली व एक ऊर्जा काम करण्याची माणसाला मिळते असेही आमदार डॉ शिंगणे यांनी सांगितले,

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक गजानन ठोसरे तर आभार सचिन खंडारे यांनी केले,कार्यक्रमाचे आयोजन अर्जुन गवई अनिकेतन्य स्कूलचे संस्थापक अध्यक्ष तसेच सचिन खंडारे गणेश पंजरकर यांनी केले होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी काळूशे, मंगेश सरकटे,संदीप इंगळे,देवानंद शिंदे,तसेच सर्व अनिकेत सैनिक स्कूलचे शिक्षक शिक्षक वृंद कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️